‘…तर अशांना ‘टिपू’न ‘ ‘टिपू’न ‘ मारले असते, लोकप्रिय मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला.

Abhijeet Kelkar On Tipu Sultan Controversy: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘टिपू सुलतान’ वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उडालाय. टिपू सुलतानाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याचा सांगत भाजपने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. सर्व स्तरातून हर्षवर्धन सपकाळ यांवर टीका होत असताना मराठी मनोरंजनसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्याने केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अभिनेता अभिजीत केळकर या सगळ्या मुद्द्यावर व्यक्त झालाय.  ‘आज महाराज असते तर अशांना ‘टिपू’न ‘टिपू’न मारले असते’ अशी सूचक पोस्ट अभिनेता अभिजीत केळकरने केली आहे.

काय म्हणालाय अभिजीत केळकर?

अभिनेता अभिजीत केळकर याने हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानाच्या  वक्तव्यावर त्याच्या पोस्टमध्ये निशाणा साधलाय. तो म्हणाला, ” आज महाराज असते तर अशांना टिपून टिपून मारले असते.”  अशी पोस्ट अभिनेता अभिजीत केळकरने केली आहे. ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत असून अनेकांच्या प्रतिक्रिया त्यावर येत आहेत.

अभिनेता अभिजीत केळकर कायमच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर त्याच्या पद्धतीने व्यक्त होताना दिसतो. आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींवर मार्मिक भाष्य करण्याची त्याची ही पद्धत अनेकांना भावत असते. एमआयएमच्या ‘ मुंब्रा हिरवा करू’ म्हणणाऱ्या नगरसेविका  यांच्या वक्तव्यावरही अभिजीतन काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्याचीही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेली. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मालेगावच्या उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आला होता. या फोटोला हिंदुत्ववादी संघटनांनी प्रखर विरोध केलेला. या विषयावर जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न केला गेला त्यावेळी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे, स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने त्यांनी विचार केला, त्याच मांदळी मध्ये त्यांच्यावर बराच काळ लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले. भारताचे भूमिपुत्र झाले. कुठल्याही विकारी विषारी विचारांना त्यांनी जवळ केले नाही. शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे’ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर होऊन मोठा गदारोळ उडाला. मतांसाठी इतके जोडे चाटनं  मी या जन्मात बघितले नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागवी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली. ‘ सामान्य माणसांना मुघलांच्या जोखडातून सोडवण्याचे आणि स्वराज्य स्थापनेचे काम छत्रपती शिवरायांनी केले. टिपू सुलतानान लाखो हिंदूंची हत्या केली. या दोघांची तुलना करण्याचा प्रयत्न हा अतिशय निंदनीय आहे’ असेही त्यांनी म्हटलेलं. या वक्तव्यावरून वातावरण तापले.

आणखी वाचा

Comments are closed.