24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्…;
अकोला क्राईम न्यूज : अकोला (Akola) शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीवर 24 वर्षीय ओळखीच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून अकोट फाईल पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
Akola Crime News: ओळखीचा गैरफायदा घेत कृत्य
ही घटना अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका गरीब कुटुंबातील पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आई आपल्या तीन मुलींसह वेगळी राहत होती. याच दरम्यान तिची ओळख सोहेल खान जमीर खान (वय 24, रा. संजय नगर) याच्याशी झाली. घरात येणे-जाणे वाढल्याचा गैरफायदा घेत आरोपीने चिमुकलीवर वाईट नजर ठेवली. सुरुवातीला अश्लील चाळे करत त्याने तिच्यावर अत्याचार केले.
Akola Crime News: मुलीने सांगितली आपबिती
आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर 8 वर्षीय पीडित मुलीने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. पोटच्या मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल करण्यात आली.
Akola Crime News: पोलिसांची तत्काळ कारवाई
अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रहीम शेख यांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली. पोलिसांनी आरोपी सोहेल खान याला अटक केली असून त्याच्यावर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अकोला शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.