दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजितदादांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांद
अजित पवार विमान क्रॅश ब्लॅक बॉक्स दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच विमान अपघात तपास ब्युरोकडून अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा (आगीचा) दुष्परिणाम झाला आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाल्याचं विमान अपघात तपास ब्युरोकडून सांगण्यात आलं आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय? (Ajit Pawar Plane Crash Update)
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विमान अपघात तपास ब्युरोकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. हे बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झालं आहे. त्यापैकी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरोला यश मिळालं आहे. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधींची मदत मागितलेली आहे. तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅंडर्डनुसार पुरावेनिष्ठ तपास करत अशल्याचं सांगण्यात आलं आहे. (Ajit Pawar Plane Crash Black Box Update Marathi News)
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? (What is a black box?)
सर्वात पहिले विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला जातो. ज्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे रेकॉर्डिंग डिव्हाइस असते, ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केले जाते. ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.
ब्लॅक बॉक्स कोण शोधतं? (Ajit Pawar Plane Crash Black Box)
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स ही त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट ठरते. विमान अपघातानंतर त्याच्या तपासासाठी खास प्रशिक्षण दिलेली एअर क्रॅश तपासणी टीम ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम करते. विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्या वतीने या टीम्स पाठवण्यात येतात. यामध्ये अनेक वेळा नौदल किंवा विशेष बचाव पथक देखील सहकार्य करते.
5 दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसतेय- रोहित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)
अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर 20 दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. तसेच केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? की कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे, असंही रोहित पवारांनी सांगितले. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी 5 दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे. असो, आम्ही मात्र अजितदादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू- (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानानेसकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.