भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? ‘या’ दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत
मुंबई : टी 20 विश्वचषकातील लीग स्टेजमधील म्हणजे साखळी फेरीतील सामने संपण्याच्या मार्गावर आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले होते. लीग स्टेजमधील सामने संपल्यानंतर सुपर 8 मधील सामन्यांना सुरुवात होणार आहे. 17 फेब्रुवारी म्हणजेच आज पर्यंत 7 संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले आहेत. सुपर 8 मध्ये अ गटातून भारताशिवाय कोणता संघ दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यापैकी एक संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. तर, भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि झिम्बॉब्वे या संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर 8 मध्ये भारताविरोधात कोणते संघ लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2026 च्या टी 20 विश्वचषकात चषकात सुपर 8 मध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे यांच्यासोबत होणार आहे. भारताचा लीग स्टेजमधील अजून एक सामना बाकी आहे. टीम इंडिया आणि नेदरलँड यांच्यात शेवटचा सामना होणार आहे. यानंतर 22 फेब्रुवारीपासून सुपर 8 च्या लढतींना सुरुवात होईल.
सुपर- 8 मध्ये भारताचे सामने
22 फेब्रुवारी- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
26 फेब्रुवारी- भारत विरुद्ध झिम्बॉब्वे- एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
1 मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता
4 मार्चपासून उपांत्य फेरीच्या लढती
टी 20 वर्ल्ड कपचा उपांत्य फेरीचा पहिला सामना 4 मार्चला खेळवला जाईल. उपांत्य फेरीचे सामने कुठं होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.जर, पाकिस्ताननं उपांत्य फेरीत धडक दिली तर त्यांचा उपांत्य फेरीचा सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. पाकिस्तान 4 मार्चला उपांत्य फेरीचा सामना खेळेल. तर, दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. तर, टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम फेरीचा सामना 8 मार्चला होणार आहे. जर, पाकिस्ताननं अंतिम फेरीत धडक दिली तर सामना कोलंबोत होईल. पाकिस्तान अंतिम लढतीत पोहोचला नाही तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.