अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी का
अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट, राष्ट्रवादीचे विलिनीकरण. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची सर्वाधिक चर्चा झाली. अजित पवारांनी निधनापूर्वी दोन राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भाने चर्चा सुरू केली होती, त्याअनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही महायुतीचे शिल्पकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या परवानगीनेच सुरु होती. 5 ऑक्टोबर 2025 ला प्रवरा येथील एका कार्यक्रमात अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच विलिनीकरणाच्या हालचालींना वेग आला होता. 5 ऑक्टोबरच्या भेटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अजित पवारांनी चर्चा केली आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना बाजूला ठेवत 14 नोव्हेंबरला दिल्लीत पुन्हा अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकांना वेग आला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिली आहे. (Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger)
विलीनीकरणाला विरोध असं आपण कधीही म्हटलं नाही असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या मृत्यूनंतर सुरू करण्यात आली ही बाब आमच्यासाठी क्लेषकारक होती असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. तसेच सुनेत्रा पवारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असून औपचारिक घोषणा बाकी आहे, अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली. एबीपी माझाला सुनील तटकरे यांनी विशेष मुलाखत दिली. यावेळी सुनील तटकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचा दावा- (Shashikant Shinde On NCP Merger)
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे भाष्य केले होते. 12 फेब्रुवारीला आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करणार होतो. विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले होते.
अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू- (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानानेसकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.