लाय डिटेक्टर चाचणी, ब्रेन मॅपिंग अन् नार्को टेस्ट; महादेव मुंडे प्रकरणात घडामोडींना वेग; 14 सं

बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील दोन संशयीतांची आज नार्को टेस्ट केली जाणार आहे.तर एका संशयीताची ब्रेन मॅपिंग (Beed Crime News) तपासणी करण्यात आलेली आहे.या तपासणीच्या अहवालानंतरच कारवाईची पुढील दिशा ठणार आहे. पळीतील तहसील समोर असलेल्या मैदानात महादेव मुंडे यांचा दोन वर्षांपूर्वी खून (Beed Crime News) झाला होता, त्या प्रकरणात एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या प्रकरणात तपासासाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर व्यापक तपास करण्यात आलेला आहे. यामध्ये आतापर्यंत 14 संशयीतांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.(Beed Crime News)

यातील 8 जणांच्या लाय डिटेक्टर चाचण्या झाल्या, परंतु त्यातून काही सकारात्मक पुरावे समोर न आल्याने त्यांची ब्रेन मॅपिंग (Beed Crime News) करण्यात आलेली नव्हती तर उर्वरित 6 जणांच्या तपासणीत काही बाबी समोर आल्याने त्यांच्या ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यात आल्या होत्या, तसेच 3 जणांची नार्को टेस्ट देखील यापूर्वीच करण्यात आलेली आहे. दरम्यान मंगळवारी एका संशयीताची ब्रने मॅपिंग तपासणी करण्यात आलेली असून आता उर्वरित दोघांची नार्को टेस्ट (Beed Crime News) आज होणार आहे. याच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीवरुन पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.(Beed Crime News)

(Beed Crime News) आत्तापर्यंत नेमकं काय घडलं?

– महादेव मुंडे यांचा 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर धारदार शस्त्राचे वार करुन खून

– आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण सर्वप्रथम समोर आणले

– यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली

– मुंडे कुटूंबीयांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत

– ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

– मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांच्या भेटीनंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन

– एसआयटीकडूनही तपासाला वेग; सहा महिन्यात दोनशेजणांची तपासणी

– पाचशेहून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासले

– चौदा संशयीतांपैकी आठ जणांची लाय डिटेक्टर तपासणी

– सहा जणांची ब्रेन मॅपिंग तपासणी

– ब्रेन मॅपिंगनंतर तीन जणांची नार्को तपासणी पूर्ण; उर्वरित दोघांची आज तपासणी होणार

– एका संशयीताला लिव्हरचा त्रास असल्याने त्याची केवळ ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यास न्यायालयाची परवानगी

– अहवाल समोर आल्यानंतर एसआयटीकडून होऊ शकते ठोस कारवाई

हत्या ते होण्यापूर्वी कोणा कोणाला भेटले?

– 20 ऑक्टोबर 2023 ला रात्री महादेव मुंडे यांनी 6 वा.ट्युशन होऊन मुलांना घरी सोडले.
– त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले.
– आझाद चौकात मित्राला भेटले.
– आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वा आढळले.
– ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते, अशी कुटुंबीयांनी माहिती दिली.
– याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक या सह इतर कागदपत्र होते.
– ही मोटरसायकल सापडली मात्र महादेव मुंडे कुठे होते, हे माहित नाही या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही.
– दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली, त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.
– 21 ऑक्टोबर 2023
– सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला.
– हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला मात्र तो फोन स्विच ऑफ आला.
– त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले.
– महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या आणि गळा कापलेला होता
– त्याचबरोबर हातावर गालावर पाठीवर वार होते
– महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मीचे कलेक्शन साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते.
– मृतदेहाचे संशोधन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.
– अनेक चकरा मारूनही प्रकरणाचा तपास लागत नसल्याने मुंडे कुटुंबीयांनी सदरील प्रकरण एलसीबीला वर्ग करण्याची विनंती परळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पीआय सानप यांना केली.
– 16 डिसेंबर 2023 ला मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते.
– हा गुन्हा एलसीबीला वर्ग करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली.

आणखी वाचा

Comments are closed.