AI क्रांतीची नवी पहाट! OpenAI Academy x NxtWave Buildathonचा ग्रँड फिनाले झाला ऐतिहासिक, 11 लाख

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026 : इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जनरेटिव्ह एआय (GenAI) विद्यार्थी स्पर्धा ओपनएआय अकादमी x एनएक्सटीवेव्ह बिल्डॅथॉनचा (OpenAI Academy x NxtWave Buildathon) राष्ट्रीय अंतिम फेरीत भव्य समारोप सुषमा स्वराज भवन, नवी दिल्ली येथे झाला. या उपक्रमातून 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत AI क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे 60 टक्के विद्यार्थी टियर-2 आणि टियर-3 शहरांतील होते. या विद्यार्थ्यांनी जनरेटिव्ह एआयच्या साहाय्याने आरोग्य, शेती, सार्वजनिक सुरक्षा, महिला उद्योजकता आणि शिक्षण यांसारख्या स्थानिक समस्यांवर आधारित व्यवहार्य उपाय सादर केले. त्यामुळे “AI भारत” या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार मिळताना दिसला.

ही बिल्डाथॉन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) इंडियाएआय मिशन अंतर्गत प्री-समिट उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आली होती. दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा सात राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रादेशिक फेऱ्यांमधून 90 संघ राष्ट्रीय अंतिम फेरीत पोहोचले.

मान्यवरांची उपस्थिती

अंतिम फेरीचे परीक्षण OpenAI इंडिया व एशिया पॅसिफिकचे हेड ऑफ एज्युकेशन राघव गुप्ता, GTM APAC प्रमुख संदीप एन, AICTE चे मुख्य समन्वय अधिकारी डॉ. बुद्ध चंद्रशेखर, चिराटे व्हेंचर्सचे व्हीपी सहर्ष शर्मा तसेच JP Morgan Chase आणि MakeMyTrip चे उद्योगतज्ज्ञ यांनी केले. मूल्यांकन करताना LLM चा प्रभावी वापर, स्केलेबिलिटी आणि सिस्टिम आर्किटेक्चर या निकषांना प्राधान्य देण्यात आले.

NITI फ्रंटियर टेक हबच्या लीड आर्किटेक्ट रमा लंका देवी यांनी, “भारताची युवा पिढी ही केवळ AI शिकणारी नाही, तर ती AI राष्ट्रनिर्माते आहेत,” असे मत व्यक्त केले.

NxtWave चे CEO व सह-संस्थापक राहुल अत्तुलुरी म्हणाले की, “OpenAI सोबतच्या या उपक्रमातून देशातील सर्वात मोठे GenAI विद्यार्थी आव्हान उभे करण्यात आले आहे. भारतात मोठा AI टॅलेंट पूल निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

OpenAI च्या ग्लोबल हेड ऑफ AI डिप्लॉयमेंट इंजिनिअरिंग बोनी चॅटर्जी यांनी सांगितले की, “भारतातील विद्यार्थी प्रयोगांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे झेप घेत आहेत. ग्रामीण आरोग्य ते कृषी उत्पादनक्षमता अशा विविध क्षेत्रांमध्ये ते वास्तवाधारित उपाय साकारत आहेत.”

विजेत्यांची घोषणा

एकूण ₹11 लाखांच्या पारितोषिकांसह विजेत्यांना त्यांच्या प्रकल्पांच्या विस्तारासाठी विशेष मार्गदर्शनही देण्यात येणार आहे.

ग्रँड चॅम्पियन (₹5 लाख) :

बिनधास्त – लुमोस एआय (पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र)
दृष्टी, श्रवण व वाणी बाधित व्यक्तींना स्वतंत्र संवाद आणि पर्यावरणाची जाणीव देणारी रिअल-टाइम वेअरेबल प्रणाली.

उपविजेता (₹3 लाख):

ProjectK (NIAT – AMET, तामिळनाडू)
विद्यमान ट्रॅफिक कॅमेऱ्यांवर आधारित एआय रिअल-टाइम ट्रॅफिक इंटेलिजन्स प्रणाली.

द्वितीय उपविजेता (₹2 लाख):

ProteinX (BV Raju Institute of Technology, तेलंगणा)
नैसर्गिक भाषेच्या साहाय्याने CAD मॉडेल डिझाइन आणि मॉडिफाय करणारा AI को-पायलट.

चौथा क्रमांक (₹५० हजार):

लाइनलेन्स (एमएस रमैया इंजिनियरिंग कॉलेज, कर्नाटक)
संशोधकांच्या ब्राउझरला एजंटिक AI च्या मदतीने CRM वर्कस्पेसमध्ये रूपांतरित करणारी प्रणाली.

पाचवा क्रमांक (₹50 हजार) :

रुद्राक्ष – ईसारथी (NIAT – VGU, राजस्थान)
रोजच्या वाहनांना AI-आधारित रोड ऑडिटरमध्ये बदलून रस्त्यांवरील दोष ओळखणारी प्रणाली.

NxtWave बद्दल

NxtWave Disruptive Technologies Pvt Ltd ही आघाडीची EdTech कंपनी असून, विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-रेडी कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रकल्पाधारित शिक्षण, मेंटरशिप आणि संरचित अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यात कंपनीने हातभार लावला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.