भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट; दीड महिन्यात तरुणाशी 11 वेळा बोलली, मुलीने 8 वेळा
पुणे: इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) केल्याची घटना काल (मंगळवारी, ता १७) समोर आली. तरूणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून दोन तरूणांनी तरुणीचं अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या घटनेवर सविस्तरपणे माहिती दिली आहे, त्यानुसार ते दोघे फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे आता या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात आहे, त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.(Bhigwan Kidnapping Case) अशातच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या तरूणीमध्ये आणि अपहरण केल्याचा आरोप आहे त्या तरूणामध्ये फोनवरून, मेसेजवरून कॉल आणि मेसेजवरून बोलणं झाल्याची माहिती समोर आली आहे.(Bhigwan Kidnapping Case)
Bhigwan Kidnapping Case: दीड महिन्यात तरुणाशी 11 वेळा बोलली, मुलीने 8 वेळा मेसेज पाठवला
अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावर अपहरणाचा आरोप आहे त्या तरुणामधे मागील दिड महिन्यात अकरा वेळा संपर्क झाला आहे. यातील तीन वेळा अपहरणाचा आरोप असलेल्या मुलाने मुलीला फोन केला असून आठ वेळा मुलीने मुलाला एसएमएस केले आहेत. आरोपी मुलाने केलेले हे फोन मध्यरात्री उशीरा केलेले आहेत. या तीन कॉलचे ड्युरेशन अवघे तीन ते पाच सेकंद इतकेच आहे.
मात्र त्यानंतर लगेचच त्यांच्यामध्ये व्हॉटसॲप कॉल सुरू झाले आहेत. या व्हॉटसॲप कॉलचे डिटेल्स आणि व्हॉटसॲप चॅटचे डीटेल्स मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत अशी माहिती समोर आली आहे.
Bhigwan Kidnapping Case: दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचं तपासात समोर
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती देताना सांगितलं की, किडनॅपिंगची केस आमच्याकडे आली आहे, या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे. यामध्ये जे पीडित आहे ते आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आलं आहे. हे सर्व तपासामध्ये आढळलं आहे, त्या अनुषंगाने काल घटनेनंतर आम्ही चार टीम रवाना केल्या होत्या, सर्वांचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाले आहेत, त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत. मी सर्व संघटनांना आवाहन करतो की, कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पडू नये, बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये. पोलीस तपास करत आहेत. यामध्ये जे काही सत्य आहे ते उजेडात येईल. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी पोलीस प्रशासन तपास करत आहे.
Bhigwan Kidnapping Case: दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात, लहाणपणापासूनची ओळख…
12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानचे आम्ही त्यांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. त्या दरम्यान त्यांचे कॉल झालेले दिसत आहेत. टेक्स्ट मेसेज झालेले दिसत आहेत. हे फक्त रेगुलर सिम कार्ड वरून झालेला आहे. व्हाट्सअप चा डाटा अद्याप मिळालेला नाही, त्याची माहिती मागवलेली आहे, त्यामधून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. लहानपणापासून त्यांचे एकमेकांशी ओळख आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या धर्मांचा अँगल आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की आंदोलने मोर्चे करू नयेत. आरोपींना अटक करण्यात येईल. या संदर्भातल्या ज्या प्राथमिक तपासातल्या बाबी समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. त्यावर लक्ष द्यावं बाकी. आंदोलने वगैरे करू नयेत असं मी आवाहन करतो, आम्ही सध्या सीसीटीव्ही तपासून त्या दृष्टीने तपास करत आहोत. त्या रूटने गेलेले आहेत. त्या रूट चा तपास करत आहोत, आमच्या टीम वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा तपास करत आहेत. लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ असेही पुढे पोलिसांनी माहिती देताना सांगितला आहे.
मुलीचे काका यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मुलगी इथे शिकण्यासाठी नव्हती, ती मामाकडे शिकण्यासाठी होती. ती लग्नासाठी आली होती. खरेदी करायला गेल्यावर तिचे अपहरण केले. ते दोघे शेजारी राहतात, हे खरं आहे, पण ती इथे शिक्षणासाठी नव्हती तर ओळख कशी असेल.पोलीस आम्हाला पाहिजे तशी माहिती देत नाहीत. आमच्या मुलीला लवकरात लवकर शोधावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.