रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया, म्हणाले मी फोन केला होता…

अजित पवार विमान अपघातावर प्रफुल्ल पटेल अजित दादांचा अपघात (Ajit Pawar Death News) होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन गेला होता, असा दोष राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash) यांनी केला होता. यावर आता मृतत्यामुळे अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. मी दिल्लीत होतो तेव्हा, शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाराच्या संदर्भात मी त्यांना फोन केला होता. तर अजित दादांनी याच्यावर मी नक्कीच चुकाऱ्यांची व्यवस्था करतो, असं म्हटलं होतं. अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

तर दुसरीकडेरोहित पवारांनी केलेल्या आरोपावर प्रफुल पटेल यांni सावध प्रतिक्रिया देत म्हणाले तेमी जबाबदार व्यक्ती असून मी संयमाने बोलेल. माझ्याजवळ पुरावे असेल तेव्हाच बोलेल.

Praful Patel on Rohit Pawar : मी फार जबाबदार व्यक्ती असून मी फार संयमाने बोलेल

रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर एक हादरवणारा आरोप केलाहे. पायलटद्वारे अजित दादांचे विमान मुद्दाम खाली आपटलं आणि स्फोट घडवला, असा आरोप त्यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली असून मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल आणि माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

Praful Patel : सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अजित पवार विमान दुर्घटनेमध्ये अनेक शंका कुशंका असल्यामुळे याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे काल मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन अजित पवार विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली. यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की अजित दादा यांचं जाणं ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सखोल तपास विविध यंत्रणेद्वारे होत आहे. राज्य सरकार सुद्धा तपास करत आहेत. परंतु यामध्ये अनेक लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. अचानकपणे एवढी मोठा दुर्घटना कशी होऊ शकते, याची सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी आणि ही महाराष्ट्रात घटना झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार याबाबत सीबीआयला चौकशी करण्यात सांगू शकते. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही काल निवेदन देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले

आणखी वाचा

Comments are closed.