भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकं प्रकरण काय?
भिवंडी महानगरपालिका निवडणूक 2026 : भिवंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या नाराज नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नाराज नगरसेवक शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजपचा एक गट नारायण चौधरींच्या विरोधात आहे. नारायण चौधरी काँग्रेस सोबत गेल्यानं भाजपचा एक गट नाराज आहे. काँग्रेससोबत जाण्याची खेळी असल्यानं भाजपचे नगरसेवक नाराज झाले आहेत. काँग्रेस सोबत युती कशी होऊ शकते? असा नगरसेवकांचा सूर आहे. दरम्यान, याबाबत सर्व नगरसेवकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळलं आहे.
कोणकोणत्या नगरसेवकांना घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
सुमित पाटील
निलेश चौधरी
वैभव भोईर
यशवंय टावरे
प्रकाश टॉवर
गीता नाईक
महेंद्र गायकवाड
हनुमान चौधरी
दिव्या पाटील
भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजी समोर
राज्याच्या राजकारणात सध्या विविध हालचाली होताना पाहायला मिळतं आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून फोडाफोडीचे सत्र पाहायला मिळते आहे. अनेक कार्यकर्त्यांनी स्वपक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेकडे सर्वात जास्त वाटचाल केली आहे. दरम्यान भाजपाकडे आणि शिवसेनेकडे तुलनेने संख्या बळ जास्त झालं आहे. अशात महापालिका निवडणुका होऊन बरेच दिवस उलटले तरी भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दरम्यान भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजी समोर आली आहे. नाराज नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
भिवंडी महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज करण्यात आले. यामध्ये महापौर पदासाठी 9 तर उपमहापौर पदासाठी 6 जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये राजकीय पक्षाच्या 5 जणांनी तर, इतर 4 अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच उपमहापौर पदासाठी 6 जणांनी अर्ज दाखल केला आहे. त्यापैकी 4 जण राजकीय पक्ष वाले तर इतर पक्षाच्या 2 जणांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे महापौर पदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे, काँग्रेसचे तारिक मोमिन यांनी महापौर आणि उपमहापौर दोन्हीसाठी नामनिर्देशन दाखल केल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
महायुतीकडे 34 नगरसेवक
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून 34 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मदतीची आवश्यकता आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. मात्र, महायुतीतही महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत. त्यामुळे आज दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे.
भिवंडीत 90 पैकी कोणाला किती जागा? बहुमताचा आकडा 46
काँग्रेस – 30 जागा
भाजप – 22 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 12 जागा
शिवसेना – 12 जागा
समाजवादी पक्ष – 6 जागा
कोणार्क विकास आघाडी – 4 जागा
भिवंडी विकास आघाडी – 3 जागा
अपक्ष – 1 जागा
आणखी वाचा
Comments are closed.