पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापड
भिगवण : आई अन् भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. या प्रकरणी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांची सहा पथकं तरूणीचा शोध घेत होती. अद्यापही त्यांचा तपास लागला नसल्याचं समोर आलं आहे. 42 तास उलटले तरी पोलिसांना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मुलीचा शोध घेता आलेला नाही.
पोलिसांनी अडीचशे किलोमीटर अंतर पार केलं
पोलिसांनी अडीचशे किलोमीटर अंतर पार केलं असलं तरी मुलीच्या शोधासाठी सहा पथके रवाना केले आहेत. काल गोपीचंद पडळकर यांनी या मुलीला दबावात टाकून व्हिडिओ तयार केला असल्याचा आरोप केला तर मुलींना मी स्वतः निघून आली असल्याचं सांगितलं आहे. भिगवण मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंदची हाक काल देण्यात आली होती. काल कडकडीत बंद पाडल्यानंतर आज भिगवण पुन्हा एकदा सुरळीत सुरू आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.(Bhigwan Kidnapping Case)
तर भिगवण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,बाजारपेठेतून खरेदी करून परतताना सार्वजनिक विश्रामगृहालगत हॉटेल आनंदच्या पाठीमागील बाजूला आरोपी दुचाकी व अशोक लेलँड टेम्पोसह दबा धरून बसले होते. पीडित कुटुंब दुचाकीने येताच त्यांनी दुचाकी अडवली, आई व भावाला बांबूने मारहाण केली आणि मिरचीपूड टाकून तरुणीचे अपहरण करून टेम्पोमधून पळ काढला.(Bhigwan Kidnapping Case)
अवघ्या पाच दिवसांवर लग्न
अपहरण झालेल्या तरुणीचे अवघ्या पाच दिवसांवर लग्न ठरले होते. आरोपी व तरुणी एकाच वस्तीतील असल्याने अपहरणामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नव्हता. तरूणीचा शोध घेतला जात आहे. बुधवारी (दि. १८) भिगवणची बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केल्यानंतर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
अपहरण झालेली तरुणी आणि तरुणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिने म्हटलंय की, जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे तरुणीने सांगितले आहे. आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचा खुलासा या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. मी जहीर शेख यांच्यासोबत ९ वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे. कालच्या प्रकरणात माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाहीये. मी माझ्या इच्छेने आली असल्याचे तरुणी या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते आहे.
आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी भिगवण येथे भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचा काढला. बसस्थानक परिसरात निषेध व्यक्त करत सभा घेतली. आमदार पडळकर म्हणाले, सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, कोणत्याही व्यक्ती हितासाठी ही लढाई नसून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजेत.
आणखी वाचा
Comments are closed.