‘ती स्वतःहून गेली नाही तर तिला…’, तरूणीच्या प्रतिज्ञापत्रावर अन् व्हिडीओवर नातेवाईकांचा तीव्र

भिगवण : आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा थरारक अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला दांडक्याने मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये कोंबून नेले, अशी फिर्याद तरूणीच्या आईने आणि भावाने दिली होती. या प्रकरणी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, बाजारपेठेतून खरेदी करून परतताना सार्वजनिक (Bhigwan Kidnapping Case) विश्रामगृहालगत हॉटेल आनंदच्या पाठीमागील बाजूला आरोपी दुचाकी व अशोक लेलँड टेम्पोसह दबा धरून थांबले होते. पीडित कुटुंब दुचाकीने येताच त्यांनी दुचाकी अडवली, आई व भावाला बांबूने मारहाण केली आणि मिरचीपूड टाकून तरुणीचे अपहरण करून टेम्पोमधून पळ काढला. मात्र या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुलीने मी माझ्या मर्जीने गेली असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे, तर त्याउलट तिच्या नातेवाईकांनी मुलगी स्वतःहून गेली नाही तर तिला पळवून नेलं असल्याचा दावा केला आहे, तर तिच्या मामाने मुलगी आमच्यासोबत आली नाही तर मी पोलिस स्टेशनच्या समोर आत्महत्या करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

व्हिडीओ खरे आहेत, की खोटे आहेत ते समजत नाहीये- तरूणीचे काका

आम्हाला ती बातमी रात्री समजली, मुलगी बारामती पोलिस स्टेशला हजर आहे, पण आम्हा जाण्यास अडचण आली मुलीच्या आईची तब्येत बिघडली, त्यामुळे तिला भिगवणच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यामुळे आम्ही काल रात्री जाऊ शकलो नाही. आज आम्ही काही वेळात निघणार आहे. आमच्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आला की, त्यात ती म्हणाली की, ९ वर्षांपासून आमचे प्रेमसंबंध आहेत, त्यानंतर आजच्या प्रतिज्ञापत्रात म्हणलंय की १ वर्षापासून प्रेमसंबंध आहेत, व्हिडीओ बनवताना आणि व्हिडीओवेळची ही तफावत कशी आहे, किंवा बनवताना व्हिडीओ कसे बनवलेत,  या गोंधळात आहे, सत्य बाहेर यायला तयार नाही, आमची मुलगी आमच्या ताब्यात आली की आम्ही तिच्याशी बोलू, त्याचबरोबर तिने बनवलेले  व्हिडीओ खरे आहेत, की खोटे आहेत ते समजत नाहीये, आणि आम्ही ते काही सांगू शकत नाही. मुलगी आता प्रशासनाच्या ताब्यात आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे, ती दबावाखाली आहे का ते सांगता येत नाही, तिचे घरचे आई, भाऊ, काका, सगळे नातेवाईक जाऊन तिच्याशी बोलणार त्यानंतर जो काही आहे तो निर्णय घेणार असल्याचं मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

स्वतःहून गेली नाही तर तिला…- तरूणीचा भाऊ

तर तरूणीच्या भावाने माध्यामांशी बोलताना सांगितलं की, त्या दिवशी आम्ही लग्नाची खरेदी करून येत होतो, त्यावेळी रस्त्यात अडवून आम्हाला मारहाण केली, आमच्या डोळ्यात चटणी टाकली, आणि माझ्या बहिणीला गाडीत टाकून नेले, ती स्वतःहून गेली नाही तर तिला जबरदस्तीने नेलं आहे, घटना घडली तेव्हा तिथे दुसरं कोणीचं नव्हतं, ती तिचं ती गेलेली नाही, तीला नेलं आहे, तिला आमच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे, असंही तरूणीच्या भावाने म्हटलं आहे.

…तर मी पोलिस स्टेशनसमोर आत्महत्या करेन – तरूणीचा मामा

पोलिसांनी तिचे व्हिडीओ आणि बाकी गोष्टी चेक करून घेतल्या पाहिजेत, ती म्हणते चटणी टाकलेली नाही, तिथं चटणी पडलेली होती. ती पोलिसांना देखील सापडली आहे. त्याचबरोबर आज तिने जे सांगितलं की, तिच्या भावाच्या फोनवरून फोन केला होता ते, मग तिच्याकडे जर फोन होता, तर तिने भावाच्या फोनवरून फोन का केला होता, पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केला आहे. त्याचे कॉल रेकॉर्ड काढले पाहिजेत, कोण काय बोललं आहे ते, कोणी कॉल केला आहे, ती सगळी माहिती समोर आली पाहिजे, आरोपींना आधी अटक करावी, आरोपीच्या हाती माझी भाची होती, तिच्यावरती दबाव टाकलेला होता. ती दुसरीकडे होती शिकायला मग हे दोघे रिलेशनशीपमध्ये कसे आले, असा सवाल मुलीच्या मामाने उपस्थित केला आहे. तर त्यांनी पुढे म्हटलंय की, मुलीला आम्ही भेटलेले नाही, ती घाबरलेली आहे, त्यामुळे ती तशी बोलत आहे, आम्ही गेल्यानंतर ती आमच्यासोबत येईल असा विश्वास मला आहे, ती नाही आली तर मी तिथेच आत्महत्या करणार आहे, पोलिस स्टेशनसमोर मी आत्महत्या करणार आहे, तिच्या मनात भीती निर्माण केली आहे. तिला वडील नाहीत, त्यामुळे ती घाबरत आहे, त्यांनी तिला भीती दाखवली आहे, भावाला आईला मारणार अशी भीती घातली असेल तिला, तिला घाबरवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या तरूणीच्या मामाने केली आहे. मुलगी आमच्यासोबत आली नाही कर मी कुटूंबासह आत्महत्या करणार आहे, कारण आम्हाला जगायचा अधिकारच राहिलेला नाही, असंही मुलीच्या मामाने म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.