भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन; डोळ्यात तिखट टाकण्याच्या दाव्याबाबत मेडिकल रिपोर्टमध्ये धक्

भिगवण : आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा थरारक अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला दांडक्याने मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये कोंबून नेले, अशी फिर्याद तरूणीच्या आईने आणि भावाने दिली होती. या प्रकरणी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  फिर्यादीनुसार, बाजारपेठेतून खरेदी करून परतताना सार्वजनिक (Bhigwan Kidnapping Case) विश्रामगृहालगत हॉटेल आनंदच्या पाठीमागील बाजूला आरोपी दुचाकी व अशोक लेलँड टेम्पोसह दबा धरून थांबले होते. पीडित कुटुंब दुचाकीने येताच त्यांनी दुचाकी अडवली, आई व भावाला बांबूने मारहाण केली आणि मिरचीपूड टाकून तरुणीचे अपहरण करून टेम्पोमधून पळ काढला. मात्र या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड नसल्याचा धक्कादायक खुलासा मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आला आहे.(Bhigwan Kidnapping Case)

Bhigwan Kidnapping Case:  तरूण अन् तरूणी पळून गेल्यावरती नेमकं कुठे कुठे फिरले

मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. बारामती पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला. मुलीने जबाबात मी माझ्या मर्जीने गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घरच्यांना बोलावलं मात्र घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती आहे.(Bhigwan Kidnapping Case)

Bhigwan Kidnapping Case: भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन

मुलींना भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन केला आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावलं आणि तिथून ते निघून गेले. चटणी टाकली होती असं तक्रारीत म्हटलं, मात्र कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचं मेडिकल रिपोर्ट मध्ये समोर आला आहे.

पहाटे साडेपाच वाजता पोलीस मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेत. मुलगी आता बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे, आता काही वेळापूर्वी झोपली असल्याचे म्हणणं आहे. पोलीस माहिती गोपनीय ठेवत आहेत. एकही अधिकारी बोलायला तयार नाही. पुढे काय होणार काय कारवाई करणार हे देखील सांगायला तयार नाहीत. पोलीस मुलाला प्रायव्हेट गाडीतून पहाटे साडेपाचला घेऊन गेले आहेत. कुठं गेलेत याबाबतची माहिती नाही. पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहेत.

Bhigwan Kidnapping Case: आत्तापर्यंत काय घडलं?

आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्या नगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वर ला गेले. आज मध्यरात्री दोघे मुलगा आणि मुलगी बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले. एकच मुलगा जो प्रियकर आहे तो हजर झाला आहे.  त्याचा दुसरा भाऊ अजून आलेला नाही, तरूणीच्या आईला अन् भावाला पोलिसांनी बोलवलं होत पण अजूनही आले नाहीत. येणार नाहीत अशी माहिती आहे. मुलीच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संवाद साधला मुलीचे कुटुंब यायला तयार नसल्याचे पोलिसांची माहिती आहे. गुन्हा भिगवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे. मात्र मुलगी बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. मुलाच्या आणि मुलीच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त आहे. मी माझ्या मर्जीने आली आहे.  माझ्यावरती कुठलाही दबाव नाही असा जबाब पोलिसांना मुलीने दिला आहे. पोलीस पहाटे साडेपाच वाजता मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेले आहेत. मुलाला कुठे घेऊन गेले हे पोलीस सांगत नाहीत. मुलगी शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे. पोलीस या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पाळत आहेत.

मुलीला न्यायालयासमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. न्यायालयात हजर करून न्यायाधीशांसमोर जबाब जाईल घेतला. इंदापूर किंवा बारामती पोलीस ठाण्यात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.