आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली अन् दुसऱ्या दिवशी सकाळी मुलानं संपवलं, कोल्हापुरातील घटनेत धक्

कोल्हापूर : चैनीसाठी दागिने लुटण्याकरिता चहातून विषारी औषध पाजून नातवाने चुलत आजीचा खून केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur Crime News) गंगावेश परिसरामध्ये ही घटना घडली असून त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. याप्रकरणी नातू प्रेम भिऊंगडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. तर उषा मारुती भिऊंगडे यांचा नातवाने चहातून (Kolhapur Crime News) घातलेल्या विषयामुळे मृत्यू झाला आहे. सुरुवातीला उषा यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा बनाव करण्यात आला. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि प्रेम अलगद पोलिसांच्या जाळ्यात आला.(Kolhapur Crime News )

उषा भिऊंगडे आपल्या पतीसह गंगावेश परिसरामध्ये राहत होत्या, मात्र काही महिन्यांपूर्वी पती यांचे निधन झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या. त्यानंतर त्यांचा पुतण्या परशराम भिऊंगडे हे त्यांना औषध आणि इतर कामासाठी मदत करत होते. मात्र परशुराम यांच्याच मुलाने चैनीसाठी पैसे मिळावे यासाठी उषा यांचा खून केला आणि आजी मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रेम याने उषा यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील चेन आणि इतर सोन्याचे दागिने पळवले. मृत्यूच्या दिवशी सकाळी प्रेम आजीकडे येऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी प्रेम यायला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याने चैनीसाठी पैसे मिळावे म्हणून आजीचा खून केल्याची कबुली दिली.(Kolhapur Crime News)

रात्री वडील परशराम हे उषा यांची सेवा करून गेले

गंगावेश येथील उषा मारुती भिऊंगडे यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व जवळचे नातेवाईक असताना चुलत नातू एकटाच नसल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले. त्याचा मोबाइलही बंद होता. मृत्यूच्या सकाळी येऊनही तो नंतर गायब झाल्याने संशय बळावला. आदल्या दिवशी रात्री वडील परशराम हे उषा यांची सेवा करून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने जाऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास बेडरूममध्ये संशयास्पद स्थितीत उषा यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या पतीचे निधन ३० डिसेंबर २०२५ रोजी झाल्याने त्या एकट्याच राहत होत्या. फुलेवाडी रिंगरोड येथील परशराम भिऊंगडे यांच्या चुलत बहिणी. मूलबाळ नसल्याने पतीच्या निधनानंतर त्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. पुतण्या परशराम त्यांची भेट घेऊन औषधे देत असे. रविवारी (१५ फेब्रुवारी) रात्री तब्येत बरी नसल्याने घरी जाऊन ते औषधे देऊन आले होते. सोमवारी सकाळी कामानिमित्त शाहूवाडी तालुक्यात गेल्यावर त्यांनी उषा यांच्या मोबाइलवर कॉल केला; पण, प्रतिसाद मिळाला नाही. चिंतेतून शेजाऱ्यांना फोन करून घराची चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा उषा बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या.

घरातील दागिने, पैसे सुरक्षित, अंगावरील दागिने चोरीला

उषा यांच्या घरातील दागिने, रोकड सुरक्षित होती. त्यांच्या अंगावर जखम नव्हती. प्रथमदर्शनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी सखोल तपास करून खुनाचा छडा लावला.

आणखी वाचा

Comments are closed.