राज्यसभा खासदारकीसाठी गजानन किर्तीकर इच्छुक, एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती

राज्यसभा निवडणूक 2026: भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभा खासदारकीसाठी शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांत पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.

राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी लॉबिॅग सुरु

दोन वर्ष आपण पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडली. आत्तापर्यंतचे सामाजिक काम पाहता राज्यसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी किर्तीकर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेला भाजप राज्यसभेसाठी किती जागा देणार हे अद्याप निश्चित नसताना शिवसेनेत राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी लॉबिॅग सुरु केली आहे.

10 राज्यांमधील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक होणार

भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार

महाराष्ट्रातील डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या  सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 मार्च 2026 असा आहे.

निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार

या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 मार्च 2026 असा आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी  शुक्रवार,  6 मार्च 2026 रोजी करण्यात येईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 9 मार्च 2026 आहे. निवडणुकीसाठीचे मतदान सोमवार, 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, 20 मार्च 2026 रोजी  पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर; 16 मार्चला मतदान, शरद पवारांसह ‘या’ खासदारांची मुदत संपणार

आणखी वाचा

Comments are closed.