सासूला मारण्यासाठी सुनेनं पाण्यात मिसळलं विष, पण पतीच मेला, धक्कादायक घटनेनं पंढरपूर हादरलं
Solapur Pandharpur Crime News : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला मारण्यासाठी विषप्रयोग केला होता मात्र, सासू वाचली आणि पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे. ज्या कळशीमध्ये विष मिसळले होते ते पाणी पिऊन नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त लोहार समाजाने आज पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढला होता.
नेमकं प्रकरण काय?
पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातीलच शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती यावरून सासू सुनेचा वाद होत होता. दरम्यान सारिकाचा प्रियकर शेखर याने विषारी औषध असलेले बाटली सारिकाकडे दिली. यानंतर ही बाटली सासू पाणी पिते त्या पाणी भरलेल्या कळशीत सारिका ने ओतली. अशा प्रकारे सासूला मारण्यासाठी सुनेने कट रचला. रात्री सासूने कळशीतील पाणी पिले मात्र चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधान जवळ ठेवला. त्याने ते पाणी पिले यानंतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला.
प्रियकर शेखर चंदनशिवेला अटक
सासूला मारण्यासाठी सुनेने केलेला विष प्रयोगात नवऱ्याचा जीव गेल्याची घटना झाली. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवेला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदनानंतर समोर येणार मृत्यूचे कारण
बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील व्यंकटेश लॉजमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा डाके असे मृत तरुणाचे नाव असून त्याने 15 तारखेला लॉजमधील रुम नंबर 205 बुक केली होती. मात्र त्यानंतर तरुण बाहेर न आल्याने आणि खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. 20 तारखेला दरवाजा आतून बंद अवस्थेत आढळला. दरवाजा उघडून पाहणी केली असता त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेह तीन ते चार दिवसांपासून खोलीत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.