माजलगावात लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह, शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार मृत्यूचं कारण

बीड क्राईम न्यूज : बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लॉजमध्येच एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समोर येणार आहे.

मृतदेह तीन ते चार दिवसांपासून खोलीत असल्याचा प्राथमिक अंदाज

बीडच्या माजलगावमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील व्यंकटेश लॉजमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा डाके असे मृत तरुणाचे नाव असून त्याने 15 तारखेला लॉजमधील रुम नंबर 205 बुक केली होती. मात्र त्यानंतर तरुण बाहेर न आल्याने आणि खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. 20 तारखेला दरवाजा आतून बंद अवस्थेत आढळला. दरवाजा उघडून पाहणी केली असता त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेह तीन ते चार दिवसांपासून खोलीत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नालासोपाऱ्यात दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या

नालासोपाऱ्यात दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. शुभम मिश्रा (31) असे मयत तरुणाचे नाव आहे. जुन्या वादातून या तरुणाची हत्या झाली असल्याची सांगण्यात येत आहे. शुभम मिश्रा (31) हा नालासोपारा पूर्वेच्या गाला नगर परिसरात राहत होता काही दिवसांपूर्वी त्याचा काही तरुणांच्या सोबत वादविवाद झाला होता. शुक्रवारी रात्री शुभम मिश्रा व त्याचे मित्र एका हॉटेल मध्ये मद्यपान करण्यास बसले होते. यावेळी बोलणं सुरू असतानाच पूर्वीच्या जुन्या भांडणावरून वादविवाद झाला होता. त्याच दिवशी रात्री 11.30 च्या सुमारास शुभम याला सिगारेट पिण्याच्या बहणाने नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान मंदिराच्या समोरच्या टपरी जवळ बोलावून शुभम यांच्या मांडीवर चाकूने वार केले. डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अंकित ब्रिजेश पांडे यांच्या तक्रारीवरून रोशन सिंग, जगन मेहंदी, सुनील मालुसरे उर्फ ​​बिगशो, सूरज सिंग उर्फ ​​कबाते, टिंकल मिश्रा आणि इतर 4 ते 5 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.