भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीनंतर माजी महापौरांना दिलासा; विलास पाटील यांना जामीन मंजूर
भिवंडी महापौर निवडणूक 2026: भिवंडीतील महापौर पदाच्या निवडणुकीनंतर माजी महापौर विलास पाटील (Vilas Patil) यांना दिलाआवडले मिळाला आहे. भिवंडी पालिका राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना न्यायालयाने जमीन मंजूर (Court Relief) केला आहे. भिवंडी पालिका निवडणुकीतील (Bhiwandi Mayor Election 2026) विजयानंतर सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या राड्यामध्ये दाखल गुन्ह्यात विलास पाटील फरार असताना 7 फेब्रुवारी रोजी विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने जमीन व्यवहारातील आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक केली. त्याप्रकरणी चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
या दरम्यान महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरणे व मतदान करणे या दोन्ही वेळा न्यायालयाच्या परवानगीने विलास पाटील महापालिकेत दाखल झाले होते. या अटके प्रकरणी सत्र न्यायालयाने माजी महापौर विलास पाटील यांना महापौर निवडणुकीनंतर जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.
महापौर पदासाठी तीन उमेदवार रिंगणात
भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले होते, त्यात नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते. हे दोन्ही अर्ज वैध असल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी दोन पैकी एक अर्ज मान्य केला. तर सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ज्यात कोणार्कचे मयुरेश पाटील, प्रतिभा पाटील यांनी आपले अर्ज माघारी घेतले. शिंदेसेनेचे बाळाराम चौधरी व सुचिता म्हात्रे यांनी देखील आपले अर्ज मागे घेतले तर काँग्रेसचे तारिक मोमीन व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महापौर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायण चौधरी, शिंदेसेनेकडून विलास पाटील तर भाजपकडून स्नेहा पाटील हे तीन उमेदवार महापौर पदाच्या निवडणुकीत होते. भिवंडी विकास आघाडीकडून सर्वप्रथम नगरसेवक झालेल्या नारायण चौधरींनी 24 वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये महापौरपदाला गवसणी घातली. त्यामुळे, राजकीय वर्तुळात त्यांची नावाची चर्चा असून महापालिकांच्या निवडणुकीत अखेर भिवंडी महापालिकेतही महापौरपदाची निवडणूक संपन्न झाली.
महापालिकेतील 90 मतांचं गणित
नारायण चौधरी – ४८
काँग्रेस – 30
राष्ट्रवादी S.P – 12
भाजप – 6
विलास पाटील – 25
कोणार्क विकास आघाडी – 4
शिवसेना – 12
समाजवादी – 6
भिवंडी विकास आघाडी – 3
स्नेहा पाटील – भाजप – 16
एक अपक्ष गैरहजर
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.