किरकोळ वाद, सिगारेट पिण्याच्या बहाण्यानं बोलावलं अन् मित्रांनीच गेम वाजवला; नालासोपारा हादरलं!
नालासोपारा क्राईम न्यूज नालासोपारा: नालासोपाऱ्यातून एक अतिशय खळबळपालक बातमी समोर आली आहे. यात शुभम मिश्रा या ३१ वर्षाचा तरुणाची दगडाने ठेचून हत्या (Crime News) करण्यात आली आहे. अशातच या हत्येप्रकरणी (Nalasopara Crime News) महत्त्वाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यानशुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेतील गाला नगर परिसरात राहत होता. घटनेच्या रात्री तो मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसला असताना वाद झाला. त्यानंतर सिगारेटच्या बहाण्याने त्याला नालासोपारा पश्चिमेतील हनुमान मंदिरासमोरील टपरीजवळ बोलावण्यात आले. तो रिक्षातून आल्यावर, आरोपी त्याच्या मागून बाईकवर येवून तेथे त्याच्या मांडीवर चाकूने वार करून डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
Nalasopara Crime News : आतापर्यंत पाच आरोपीना अटक, मुख्य आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अंकित ब्रिजेश पांडे यांच्या तक्रारीवरून रोशन सिंग, जगन मेहंदी, सुनील मालुसरे उर्फ बिगशो, सूरज सिंग उर्फ कबाते, टिंकल मिश्रा व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपीना अटक केली आहे. मुख्य आरोपी रोशन सिंग हा फरार आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता आणखीन संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.
Dondaicha : मंदिरातील दानपेटी चोरीचा 24 तासांत उलगडा; आरोपी मुका असल्याने पोलिसांची उडाली दमछाक
दोंडाईचा येथील जुने कोळदे येथे वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरीला गेल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. वर्णेश्वर महादेव मंदिरातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा शोध घेण्यात आला. संशयित आरोपी हा साहुर शिवारातील ऊसाच्या शेतात आरोपी आढळून आला.. मात्र सदर आरोपी हा मुका असल्याने त्याच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी त्याचा चुलत भाऊ राजेश पवार याने त्याला विचारपूस केली असता त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मुक्या कांतीलाल पवार (वय 40 रा. अजनाळे, ता. जि. धुळे) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण 23,050 रुपये रोख रक्कम व अंदाजे 1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.