सोलापूरच्या नातेपुतेत विवाहितेने आयुष्य संपवलं, हातावर डोळे पाणावणारा मजकूर, म्हणाली, ‘हसू झालं
सोलापूर आत्महत्येची बातमी फलटणमध्ये गाजलेल्या डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्येप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते (Natepute news) येथे एका विवाहितेने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या (Suicide news) केल्याने खळबळ उडाली आहे. पायल रणदिवे असे मृत विवाहितेचे नाव असून ती अवघ्या 22 वर्षांची होती. या घटनेनंतर पोलिसांनी सासू-सासरे दीर आणि पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Solapur crime news)
पायल रणदिवे हिला ब्युटी पार्लर (Beauty Parlour) सुरू करायचे होते . यासाठी तिने क्लासही लावला होता. मात्र कुटुंबाने तो क्लास बंद केल्याचे दुःखही ही विवाहिता पायल रणदिवे हिने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर लिहून ठेवले होते. शनिवारी सायंकाळी घरात कोणी नसताना पायल हिने आत्महत्या केली. पायलच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा असल्याने पायलच्या वडिलांनी पतीसह कुटुंबातील सासू-सासरे आणि दीर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्याची तक्रार दिली आहे. पायल ही माळशिरस (Malshiras News) तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरी राहत होती. आता पोलिसांनी या प्रकरणात पती शशिकांत रणदिवे याच्यासह तिचे सासू-सासरे यांना अटक केली असून पायलच्या दिराचा शोध पोलिसांकडून (Solapur Police) सुरु आहे. याप्रकरणात आता आणखी कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पायल रणदिवे हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर मजकूर लिहला होता. यामध्ये तिने सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला, हे सविस्तरपणे लिहले होते. “हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केले .. जीव होता तो माझा.. स्वप्न होतं ग .. आजपर्यंत शांत बसले पण आता नाही .. चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले .. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते .. SORRY”, असे पायलच्या सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून पायलच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येऊ शकणार आहे. या घटनेमुळे नातेपुते परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Solapur Latest news)
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.