अजितदादांच्या शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील; अमोल मिटकरी भावूक, विमान अप

अजित पवार यांच्या निधनावर अमोल मिटकरी अजित पवारांच्या (Ajit Pawar) शोक प्रस्तावावर आपल्याला बोलावं लागणं हा आयुष्यातील सर्वात दुर्दैवी प्रसंग असणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यावरून एका कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरी यांनी अजितदादांवर शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे आहेत, असे म्हणत अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमोल मिटकरी म्हणाले की, अजितदादांनी मला तीन वेळेस तालिकेवर बसवले. राज्याचे मुख्यमंत्री खाली बसायचे आणि मी वरती खुर्चीवर बसायचो. माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी 13 मे रोजी संपणार आहे. पण मला वाईट असे वाटते की, दरवर्षी अजितदादा असायचे. आम्ही पहिल्या दिवशी त्यांना गेटवर घ्यायला जायचो. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर बुके देऊन अजितदादांना म्हणायचो की, हे बजेटचे अधिवेशन आहे. आर्थिक पाहणी अहवाल आम्हाला वाचायला मिळावा. तेव्हा दादा सांगायचे की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्यांचे निधन झाले आहे, त्यांचा शोक प्रस्ताव असतो. पण, आता माझ्या जीवनातलं दुर्दैव बघा की, उद्या पहिल्याच दिवशी त्यांच्या नावाचा शोक प्रस्ताव मांडला जात असताना मी त्या सभागृहात असेल. माझ्यासारखा कमनशिबी आणि दुर्दैवी व्यक्ती दुसरी कोणी नसेल, असे त्यांनी म्हटले.

Amol Mitkari on Ajit Pawar Death: आज दादा नावाचा ‘बाप माणूस’ जीवनात नाही

ज्या दिवशी मला आमदारकी मिळाली त्या दिवशी त्याचा आनंद व्यक्त करायला, माझे वडील नव्हते. ते 2018 साली वारले ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आता कार्यकाळ संपत असताना वाटत होतं की, हे अधिवेशन चांगलं गाजवायचं. महत्त्वाचे प्रश्न मांडायचे. पण, ते ऐकायला आज दादा नावाचा ‘बाप माणूस’ जीवनात नाही, यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.

Amol Mitkari on Ajit Pawar Death: शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, 2020 साली मी विधान परिषदेच्या सभागृहाचा सदस्य अजित दादांच्या पुण्याईने झालो. उद्याचे होणारे अधिवेशन हे माझ्या आमदारकीच्या टर्ममधील शेवटचे अधिवेशन आहे. डिसेंबर महिन्यात अधिवेशनाचे शेवटच्या दिवशी मी नागपूरला अजितदादांना भेटलो होतो. तिथे मी त्यांना म्हटले होते की, दादा मला तुमचा वेळ पाहिजे. मला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची संघटनात्मक बांधणी राज्यात करायची आहे. त्यावेळी दादा म्हणाले की, 23 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देवगिरीवर भेटू. उद्या अजितदादांचा शोक प्रस्ताव येणार आहे. अजित पवार यांच्या बाबतीत शोक प्रस्ताव हा काळीज चिरणारा प्रसंग आहे. शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Sharad Pawar Health Update: ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅन केला, शरद पवारांचा रिपोर्ट नॉर्मल; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.