नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार लॉबिंग, काँग्रेसची एक जागेची ठाम मागणी, ठाकरेंची शिवस

NMC Swikrut Nagarsevak: नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून मित्रपक्षांमध्येच तणाव वाढल्याचे चित्र समोर आले आहे. काँग्रेस (Congress) आणि शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) दोन जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी एकत्रित लढवली होती. मात्र निकालानंतर महापालिकेत वेगवेगळी समीकरणे तयार झाली. काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्रित गट तयार केला, तर मनसेने शिंदे गटासोबत जात सत्तेत सहभाग घेतला.

NMC Swikrut Nagarsevak: संख्याबळ ठाकरे सेनेकडे, तरी काँग्रेसची मागणी कायम

महापालिकेत ठाकरे सेनेकडे 15 नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे केवळ 3 नगरसेवक आहेत. तरीही स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांपैकी एक जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा मुद्दा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला असून लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले की, महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे काँग्रेसलाही एक जागा मिळावी अशी त्यांची भूमिका आहे. स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून महाविकास आघाडीच्या बैठकीतही हा विषय मांडला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

NMC Swikrut Nagarsevak: नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा काँग्रेसचा विचार

काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या उमेदवाराऐवजी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा विचार सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत काँग्रेसकडून नाव जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिककरांच्या प्रश्नांसाठी दोन्ही पक्ष एकत्र काम करत राहतील, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला असला तरी स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून सुरू असलेली रस्सीखेच महाविकास आघाडीत नवे राजकीय समीकरण निर्माण करते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नाशिक निवडणूक निकाल 2026: नाशिक महानगरपालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा – 122

भाजप – 72

शिंदेंची शिवसेना – 26

ठाकरेंची शिवसेना – 15

राष्ट्रवादी अजित पवार – ०४

काँग्रेस – 03

मनसे – 01

अपक्ष – 01

इतर महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari on Ajit Pawar Death: अजितदादांच्या शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील; अमोल मिटकरी भावूक, विमान अपघाताबाबत अधिवेशनात आवाज उठवणार

Sharad Pawar Health Update: ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅन केला, शरद पवारांचा रिपोर्ट नॉर्मल; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.