अचानक पडली पोलिसांची धाड; महिला कर्मचारी अन् व्यवस्थापकानं इमारतीवरुन घेतली उडी; महिलेचा मृत्यू

पुणे: पुण्यात पोलिसांच्या कारवाई दरम्यान एका महिलेने आणि स्पा मॅनेजरने खिडकीतून उडी मारली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे, तर मॅनेजर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विमान नगरमधील रूट्स स्पावर (Raid on Spa center) पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांच्या ताब्यातून वाचण्यासाठी महिलेने आणि मॅनेजरने उडी मारली मात्र यामध्ये महिलेचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे.(Pune Crime News)

गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

पुणे येथील विमाननगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’वर पोलिसांनी (Raid on Spa center) छापा टाकताच महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विमाननगर पोलिस स्टेशनच्या (Vimantal Police Station) पथकाने दुपारी सुमारे तीनच्या सुमारास स्पा सेंटरवर (Raid on Spa center) कारवाई केली. अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याच्या तक्रारी

कारवाईनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. संबंधित ठिकाणी अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली होती. या प्रकरणी व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.bमृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे (Somay Munde) यांनी दिली. घटनेबाबत स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी सुरू आहे.

अपघाती मृत्यू म्हणून नोंद

संबंधित ‘स्पा’मध्ये देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय केला जात होता अशी पोलिसांना माहिती मिळाली. या प्रकरणी व्यवस्थापक व मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली जात आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.

आणखी वाचा

Comments are closed.