झारखंडच्यामधील अपघातानंतर तात्काळ AIBकडून चौकशी, ती तत्परता VSR संदर्भात का नाही? : अमोल मिटकरी

अमोल मिटकरी: झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकीf तत्परता व्हिएसआर (VSR) संदर्भात का दाखवली जात नाही? असा अस्वस्थ प्रश्न राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींni (अमोल मिटकरी) केला आहे. या संदर्भात थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. एक महिन्यानंतर हा अहवाल दिला, तीन आठवड्यानंतर ब्लॅक बॉक्स सापडला. सुमित कपूर संदर्भात डीजीसीए एक शब्द काढला नाही. या कारवाईने आम्ही समाधानी नाही, असेही अमोल मिटकरी म्हणालेत. तर डिजिसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीहे त्यांनी यावेळी केली आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. VSR व्हेंचअर्सला मोठा दणका बसला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे. यावर आमदार अमोल मिटकरींni असमाधान व्यक्त करत सखोल चौकशी करत डिजिसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Amol Mitkari on VSR : …..नाही तर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही.

दरम्यानVSR कंपनी कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे. सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून ठेवल्याची आम्हाला शंका आहे. या संदर्भात VSR व्हेंचर्स आणि डीजीसीएने उत्तर दिले पाहिजे, नाही तर महाराष्ट्र यांना जिवंत ठेवणार नाही. डिजिसीए फक्त भुलथापा देण्याचा प्रयत्न करते, कारण गाव पातळीवर आता वातावरण पेटायला लागल आहे. त्यांच्या परवानगीशिवाय विमान वाहतूक करता येत नाही मग त्या दिवशी नारदुरुस्त विमान का देण्यात आलं? असा प्रश्नही अमोल मिटकरींनी यावेळी उपस्थित केला आहे.

Amol Mitkari on DGCA: डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला

डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलंहे. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यश को-पायलट हे आता कुठे आहेत? असे अनेक प्रश्नहे आमदार मिटकरींनी यावेळी उपस्थित केले आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.