लग्न होऊनही रुग्णालयातील नर्सशी प्रेमसंबंध, बोलणं टाकल्याने नैराश्यात गेला, डॉक्टरचा 10 बिअर आण

डोंबिवली: प्रेमाच्या नात्यात भावना अनेकदा अनपेक्षित वळण घेतात आणि त्याचे परिणामही गंभीर ठरू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील डोंबिवली (Dombivli Crime Crime) येथे उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील (Dombivli Crime Crime)  एका नामांकित डॉक्टरने प्रेमसंबंधातून नैराश्यात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. स्वतःचे अत्याधुनिक रुग्णालय आणि स्थिर कौटुंबिक आयुष्य असतानाही, रुग्णालयातील हॉस्पिटलमधील नर्सशी असलेल्या संबंधांमुळे निर्माण झालेल्या तणावातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. संबंधित हॉस्पिटलमधील नर्सने बोलणं बंद केल्यानंतर डॉक्टर मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती आहे. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळासह संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले आहे.(Dombivli Crime Crime)

10 बिअर अन् 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

डोंबिवलीमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्या खाऊन या डॉक्टरने आत्महत्येचा (Dombivli Crime) प्रयत्न केला. एका नर्ससोबत प्रेमसंबंध असल्याने नर्स वारंवार लग्नासाठी तगादा लावत असल्याने डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली विष्णूनगर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.(Dombivli Crime)

या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून डोंबिवलीत त्यांचे सुसज्ज आणि नावाजलेले रुग्णालय आहे. मात्र, काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांचे त्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेशी जवळीक वाढली होती. या विवाहबाह्य संबंधांमुळे दाम्पत्यामध्ये सतत वाद निर्माण होत होते. घरगुती तणाव वाढत गेल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि अखेरीस डॉक्टरांनी पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी डोंबिवली पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत भाड्याने निवासस्थानी राहत स्वतंत्र संसार सुरू केला.

या प्रकरणाला नवे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नाची मागणी ठामपणे मांडली. आपण आधीच विवाहित असल्याने दुसरे लग्न शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर नर्सने संवाद पूर्णपणे बंद केल्याची माहिती आहे.ज्यांच्यासाठी त्यांनी कौटुंबिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याकडूनच दुरावा आल्याने डॉक्टर मानसिकदृष्ट्या खचल्याचे सांगितले जाते. या नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्यांचे सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब तपासात समोर आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले डॉक्टरांचे प्राण

डॉक्टर वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी तातडीने डॉक्टरांच्या निवास्थानी धाव घेतली. दरवाजा उघडला असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.