बारामतीत अजित पवारांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम सुरु असताना केंद्रीय स्तरावर हालचाली, VSR कंपन
अजित पवार विमान अपघातावर रोहित पवार : अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू आणि डीजीसीएकडून हालचाली सुरु असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. 28 जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघात झाला त्यादिवशी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी डीजीसीएकडून (DGCA) पहिला अहवाला आला होता. त्या अहवालात म्हटलं होतं की, फेब्रुवारी महिन्यात व्हीएसआर कंपनीच्या (VSR Company) विमानाचं ऑडिट झाले होते. त्यावेळी लेव्हल -1 च्या कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नव्हत्या, असे त्या अहवालात म्हटल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. ते बुधवारी विधानभवनाच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांचं शव रुग्णालयात होतं, त्यांचे शवविच्छेदन सुरु होते, तेव्हा डीजीसीएने हा अहवाला दिला होता. त्यामध्ये व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा विमानात लेव्हल-1 प्रकारची कोणतीही त्रुटी नसल्याचे म्हटले होते. आम्ही ज्या व्यक्तीचा राजीनामा मागतोय, ते केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री यांनीही 28 जानेवारीला एक वक्तव्य केले होते. त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या लिएरजेट विमानात सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही त्रुटी नसल्याचे म्हटले होते. त्यावेळी ते विमानाच्या पायलटबाबतही बोलले होते. डीजीसीएने त्यालाही क्लीन चिट दिली होती, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
काल डीजीसीएचा जो अहवाला आला तो म्हणजे नखाएवढं यश म्हणावं लागेल. कारण त्यामध्ये व्हीएसआर कंपनीला पळवाट शिल्लक ठेवली आहे. डीजीसीएने अहवालात नमूद केल्याप्रमाणे व्हीएसआर कंपनीच्या विमानाच्या स्पेशल ऑडिटमध्ये विमानात अनेक त्रुटी आढळून आल्याचे म्हटले. विमान उड्डाणापूर्वीचे एअर वर्दीनेस प्रमाणपत्र, एअर सेफ्टी, फ्लाईट ऑपरेशन अशा सर्वच पातळ्यांवर त्रुटी आढळल्याचे डीजीसीएने म्हटले. पण तुमच्या हलगर्जीपणामुळे आमचा नेता गेला. आज तो नेता उपमुख्यमंत्री होता, पण तो लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होता. आमच्या महाराष्ट्राचा मोठा नेता तुमच्यामुळे गेला, असे रोहित पवार यांनी म्हटले.
Rohit Pawar: रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांना विनंती
देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, या विषयात लक्ष घाला. आज मुंबईत आम्ही डीजीसीएविरोधात FIR करणार आहोत, पण गुन्हा दाखल करुन घेतला जाणार नाही, असे वाटते. मात्र, उद्या बारामतीला जाऊन PI समोर जाऊन बसू आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत त्याठिकाणी बसून राहणार आहे. हा लढा माझ्या एकट्याचा नाही हा तुमचा देखील आहे. त्यामुळे तुमच्या तुमच्या भागात देखील FIR व्हायला पाहिजे. 28 जानेवारीला केंद्रीय मंत्र्यांनी व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट दिली होती. पण महाराष्ट्रातील जनतेने आणि प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा लावून धरला, असे रोहित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.