स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा पडल्यानंतर गॅलरीतून उडी, महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता सीआयडीकडून हो
पुणेः पुण्यामध्ये विमाननगर येथील स्पा सेंटरमध्ये पोलिसांच्या छाप्यादरम्यान (Pune Crime News) इमारतीवरून उडी मारल्याने महिलेचा मृत्यू झालेल्या प्रकरणाची आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येणार आहे. मृत महिलेच्या पतीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.(Pune Crime News)
पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावे सुरू वेश्या व्यवसायावर असलेल्या विमानतळ पोलिसांनी सोमवारी (ता. २३) छापा टाकला होता. त्यावेळी इमारतीच्या गॅलरीतून खाली उडी मारलेल्या महिलेचा ससून रुग्णालयात त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास उपचारावेळी मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. २४) घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली, तर दुसरीकडे मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने (Pune Crime News) देखील याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असून, या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. मृत महिलेच्या नातेवाइकांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.(Pune Crime News)
सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याचे फॉरेन्सिक परीक्षणाची मागणी
तक्रार अर्जात महिलेच्या पतीने म्हटले आहे, घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याचे फॉरेन्सिक परीक्षण करावे, घटनास्थळी उपस्थित सर्व पोलिस अधिकारी आणि व्यक्ती त्यांचे जबाब नोंदवून घ्यावे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. मृत्यू झालेल्या महिलेबरोबर खाली उडी मारताना हुसेन शेख हा देखील जखमी झाला असून, तो या स्पाचा मॅनेजर असल्याची माहिती आहे. ही घटना अहिल्यानगर रोड विमानतळ परिसरातील ‘सिटी स्पेस बिल्डिग पहिला मजला ‘द रुटस स्पा’ येथे सोमवारी (ता २३) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती.
नेमकं काय घडलं?
विमानतळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सिटी स्पेस बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर ‘द रुटस स्पा सेंटर’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, महिला अंमलदार, पंचांसमक्ष स्पावर कारवाई करण्यासाठी सिटी स्पेस बिल्डिगमध्ये दाखल झाले. पोलिसांनी स्पाचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला पण, कोणी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेथे चार पीडित महिला आणि चार पुरुष आढळून आले. त्याच वेळी पोलिसांना एका केबीनचा दरवाजा लावलेला दिसला. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु तो दरवाजा देखील कोणी उघडला नाही. त्यामुळे तो दरवाजाही तोड्न पोलिसांनी आत प्रवेश केला. त्या वेळी एक महिला त्यांना आढळून आली. त्यांनी तिला विचारले असता, तिने सांगितले, दोघेजण गॅलरीमार्गे खाली उतरत आहेत. पोलिसांनी जाऊन पाहिले तेव्हा त्यांना दोघेजण खाली पडल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होता. पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोघांना सरकारी गाडीतून नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दोघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.