येरवडा जेलमध्ये कैद्याची संशयास्पद हालचाल पोलिसांनी टिपली, झडती घेताच अधिकाऱ्यांना सापडले 5 मोब
पुणे : पुण्यातील येरवडा (Pune Yerawada Jail) जेलच्या सीमा भिंतीलगत मोबाईल फोन सापडल्याने कारागृह पोलिसांनी १, २ व ६ बराकींमध्ये घेतलेल्या झाडाझडती मोहिमेमध्ये अधिकार्यांना अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. कारागृह अधिकार्यांना बराकीमध्ये झाडाझडती घेतल्यानंतर ५ मोबाईल फोन, २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सहायक तुरुंगाधिकारी सुनिल तुकाराम गायकवाड (वय ५५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कैदी नौशाद बदुद्रीन शेख व इतर कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहात शनिवारी समोर आला आहे. (Pune Yerawada Jail)
नेमकी घटना कशी आली समोर?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहायक तुरुंगाधिकारी नियमित कर्तव्यावर (Pune Yerawada Jail) असताना सर्कल परिसरात गस्त (Pune Yerawada Jail) घालत होते. यावेळी बाह्य शौचालयाच्या मागील भागात एका बंदीकडून संशयास्पद हालचाल होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली असता, नौशाद बदुद्रीन शेख याने जमिनीवर पडलेला मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. याबाबत विचारणा केली असता शेखने समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ केली आणि तेथून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी अधिकाऱ्यांनी (Pune Yerawada Jail) संपूर्ण प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली. कारागृह उपमहानिरीक्षकांची परवानगी घेऊन २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते साडेसहा दरम्यान विशेष झडती मोहिम राबविण्यात आली.(Pune Yerawada Jail)
बराकबाहेरील बॅगेची तपासणी करण्यात आली, त्यात…
विशेष झडतीदरम्यान बराक क्रमांक १ मधील शिक्षा बंदी नौशाद शेख याच्या बराकबाहेरील (Pune Yerawada Jail) बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यातून ‘हिरो’ कंपनीचा बॅटरी व सीमकार्ड नसलेला मोबाईल आणि चार्जिंग वायर जप्त करण्यात आली. त्यानंतर बराक क्रमांक १, २ आणि ६ च्या बाह्य परिसराचीही सखोल तपासणी करण्यात आली. या झडतीत बराक १ बाहेर ‘नोकीया’ कंपनीचे बॅटरी व सीमकार्ड (Pune Yerawada Jail) नसलेले तीन मोबाईल सापडले. तसेच बराक ६ बाहेरील भागात एक मोबाईल फोन, दोन पॉवर बँक आणि चार्जिंग वायर आढळून आल्या. कारागृहात प्रतिबंधित असलेले मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगल्याप्रकरणी नौशाद शेख आणि अन्य कैद्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे करीत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.