ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीहून आला आणि तरुणीवर अत्याचार केला, बदलापुरात धक्कादायक घटना
ठाणे बदलापूर क्राईम न्यूज : ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात एक धक्कादायक घटना घडीली आहे. दिल्लीतील तरुणाने बदलापूरमधील तरुणीवर बदलापुरात येऊन अत्याचार केला आहे. कंपनीची ट्रेनिंग देण्यासाठी आला आणि महिला कामगार तरुणीवर अत्याचार करुन गेला आहे. पोलिसांनी आरोपी पंकज शैलेंद्र कुमार याला बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूरमध्ये दिल्लीवरुन कंपनीचे ट्रेनिंग देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तरुणीला बिअर पाजून अत्याचार केला आहे.
दोन ते तीन दिवस पंकज शैलेंद्र कुमार हा पीडित तरुणीच्या घरी वास्तव्यास होता
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आणि एका ई-कॉमर्स कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीवर दिल्लीत राहणाऱ्या पंकज शैलेंद्र कुमार या आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणारा पंकज शैलेंद्र कुमार वय वर्षे 25 हा बदलापूर मध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आला होता. दोन ते तीन दिवस पंकज शैलेंद्र कुमार हा पीडित तरुणीच्या घरी वास्तव्यास होता. या दरम्यान आरोपीने तरुणीला बिअर पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तरुणीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, बदलापुरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी गाजलेल्या अक्षय शिंदे प्रकरणानंतर बदलापूर चर्चेत आले होते, मात्र महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अद्याप गंभीरच असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.