पुणेकरांनो दंड न भरल्यास थेट परवाना होणार रद्द! पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; नियमभंग क
पुणे: पुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणार आहे. वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तीस दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना (Pune Traffic Police) रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसांकडे दंड जमा करावा; असे आवाहन वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) पुणेकरांना केलं आहे, दंड न भरल्यास वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची नोटीस येणार आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर अधिकृत शॉट कोडवरून एसएमएसद्वारे नोटीस पाठवण्यात येणार आहे. 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या कालावधीत या सगळ्या नोटीसा पाठवण्यात येणार आहेत.(Pune Traffic Police)
वाहतूक नियमभंगाबाबत आकारण्यात आलेला दंड ३० दिवसांच्या आत न भरल्यास संबंधित वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा पुणे वाहतूक पोलिसांनी दिला आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून, रस्त्यावर थेट कारवाईसाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.(Pune Traffic Police)
मार्च २०१९ पासून शहरात ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियमभंगाची नोंद करून दंड आकारला जात आहे. मात्र, ई-चलन मिळूनही मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांनी दंडाची रक्कम न भरल्याचे समोर आले आहे. परिणामी प्रलंबित दंडाची प्रभावी वसुली, नियमांचे काटेकोर पालन आणि शहरातील वाहतूक शिस्त मजबूत करण्यासाठी ही कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे.(Pune Traffic Police)
ई-चलन प्रलंबित असलेल्या वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठविण्यात येणार आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे बंधनकारक राहील, अन्यथा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
दंड न भरल्यास होणार कायदेशीर कारवाई
संबंधित वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याबाबत प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्याचबरोबर संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्यात येईल.
नोटीस कशी पाठविली जाईल?
ही नोटीस वाहनमालकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येईल. ही नोटीस २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ आणि एक मार्च २०२६ या कालावधीतच पाठविण्यात येणार आहे. या कालावधीव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने येणारा कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.
दंड कसा भरायचा?
अधिकृत वेबसाइटवरून https://mahatraf-ficechallan.gov.in दंड भरणे शक्य आहे.
Pune Traffic Police App (PTP App) या अॅपवरून दंड भरता येतो.
जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात ई-चलान मशिनवर क्यूआर कोड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरावा.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाइल पाठविण्यात येणार नाही.
वाहनचालकांनी ओटीपी कोणालाही शेअर करू नये.
केवळ नोटिसमध्ये नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा.
याबाबत संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेश आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
आणखी वाचा
Comments are closed.