बारामतीतही रोहित पवारांच्या पदरी निराशा, डीजीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात FIR दाखल करायला पोलिसां

बारामती: बारामतीत शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आणि बारामती पोलिस स्टेशनमध्ये (Baramati Police Station) पोलिसांसोबत वादावादी झाल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. काल मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात देखील रोहित पवारांची (Rohit Pawar) पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती, तर आज देखील बारामती पोलिस रोहित पवारांची तक्रार घेतील पण त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

नेमकं काय घडतंय?

आज युगेंद्र पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार यांच्यासह वकिल देखील बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले. अजित पवारांचा अपघाती मृत्यूचा सीबीआय तपास करत आहे. आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे तपास वर्ग केला आहे. ते तपास करत आहेत. डीजीसीए आणि विमान कंपनी वरती गुन्हा दाखल करावा ही मागणी रोहित पवारांनी केली आहे. मोठ्या प्रमाणावरती पवारांचे समर्थक बारामती पोलिस स्टेशनसमोर दाखल झाले आहेत. पोलिसांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली तरी एपआयआर घेत नाहीत अशी वकील सूत्रांची माहिती आहे. रोहित पवार पोलिसांना पटवून देणं सुरू देण्याचा प्रयत्न करत आहेत. कसा गुन्हा दाखल करता येतो ते सांगत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. अजूनही रोहित पवारांना एफआयआर दाखल करून घेतील अशी आशा आहे.

एक तास 25 मिनिटं उलटून गेली तरी पोलीसांशी रोहित पवारांची चर्चा सुरू

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मागील एक तास 25 मिनिटं उलटून गेली तरी पोलीसांशी रोहित पावरांची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर बारामतीकरांनीदेखील गर्दी केली आहे. अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार, पुतणे युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणांबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, “बारामती आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणाची सत्यता जाणून घ्यायची आहे. माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने लोकांच्या मनात शंका बळावत असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले, रोहित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून जी काही मागणी करायची ती करतील. पण सर्वसाधारणपणे बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना जो मोकळेपणा पाहिजे, याबाबतची माहिती पाहिजे ती मिळत नसल्याने लोकांना या शंका जास्त येत आहेत, असं म्हटलं आहे. तर रोहित पवार यांच्या पाठिंबासाठी जमलेल्या अनेक समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलताना म्हटलं की, अनेक शक्ती हा गुन्हा दाखल करू देत नाहीत, म्हणून आम्ही आज बारामतीकर मोठ्या संख्येने हा गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी येथे जमलो आहोत. आम्हाला घातपात वाटतोय, कारण त्यांच्याकडून जे सांगण्यात येत आहे, ब्लॅक बॉक्स जळाला वगैरे वगैरे, या गोष्टी संशयास्पद वाटत आहेत, सर्वांनीच जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि जो अपघाताचा रिपोर्ट आहे, तो दिला पाहिजे. पण आम्हाला हा घातपात असल्याचा जाणवत आहे असेही पुढे काही समर्थकांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar Plane Crash death)

तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या युगेंद्र पवार यांनी बोलताना म्हटलं की, व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. इथे दादांचे समर्थक, दादांचे प्रेमी आणि बारामतीचे नागरिक जमले आहेत आणि संबंधित कंपनीवरती गुन्हा दाखल व्हावा, योग्य ती कारवाई व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, आम्ही सगळे रोहित दादांच्या मागे उभे आहोत. अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे, या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे, बारामती पोलिसांकडून न्याय मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे. डीजीसीएचा रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की क्रिमिनल नेगलिजेंस (Criminal negligence) मुळे विमानाचा मेंटेनन्स न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत, हे आपल्याला रिपोर्ट मध्ये दिसताना, क्रिमिनल नेगलिजेंस जर हे डीजीसीए कडून येत असेल तर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कंपनीची सखोल चौकशी झाली पाहिजे, या सगळ्याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे आणि लवकर झाली पाहिजे हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. आतापर्यंत कोणती कारवाईने झालेली आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहे आम्हाला विश्वास आहे की आपल्या सर्वांना न्याय मिळेल.

आणखी वाचा

Comments are closed.