दूधवालाही लवकर उठतो असं म्हणत दादांना हिणवलं, सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर हल्ला
सुनील तटकरे राष्ट्रवादी आधिवेशण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल फटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला, 2004 साली 73 च्या वर जागा आपल्या पक्षाच्या आल्या होत्या. त्यामध्ये सर्वात जा्स्त योगदान हे अजित पवार यांचे होते असे तटकरे म्हणाले. 2004 साली जर सर्वात जास्त जागा आपल्या पक्षाला मिळाल्यामुळं मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राने अजितदादांच्या रुपाने सर्वोत्तम मुख्यमंत्री अनुभवला असता असे तटकरे म्हणाले. पण यापासून महाराष्ट्रातील 13 कोटी जनता मुकलेली आहे असे तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ते बोलत होते.
सुप्रिया सुळेंसह रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका
महाराष्ट्रात अजित पर्व सुरू होतं आहे असं मी म्हणलो त्यावेळी माझ्यावर टीका झाली. मात्र, मी ठाम होतो. लोकसभा निवडणुकीत आपल्याला पराभव पत्करावा लागला. मी एकटा विजयी झालो. अजित पवारांबाबत टीका झाल्याचे तटकरे म्हणाले. अजित पवार पहाटे कामाला सुरुवात करतात, त्यावेळी टीका करण्यात आली काय म्हणाले, पहाटे दूधवाला देखील उठतो, त्यांना सांगायचं आहे दुधवाला पेपरवाला सेवा देतो अजित पवार देखील पहाटे उठून सेवा देत होते, असे म्हणत तटकरेंनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली. काहींजण म्हणाले अजितदादा 12 ते 13 वेळा कुणाला तरी भेटायला गेले. लोढांचे सीसीटीव्ही तपासा कुणाच्या घरी किती वेळा गेले, हे तपासा हे बोलणं वाईट होतं, कुणाच्या घरात गेले असं म्हणणं चुकीच होतं असे म्हणत तटकरे यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्यात अजित पवारांचा मोठा हात
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्यात अजित पवारांचा मोठा हात आहे. ज्यावेळी आपल्या 73 जागा निवडून आल्या त्यावेळी सर्वात जास्त योगदान हे अजित पवारांचं होतं असे तटकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्यानुसार महाराष्ट्राने अजित पवारांच्या रुपाने चांगला मुख्यमंत्री पाहिला असता.
अजित पवारांवर मधल्या काळात 2012 सालापासून खूप टीका झाली. त्यावेळी त्यांना सुनेत्रा पवार यांनी साथ केली. त्यामुळं त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा हक्क तुम्हाला आहे असे तटकरे म्हणाले. अजित पवारांचा एका दिवस फोन आला आणि त्यांनी राजीनामा देण्याच सांगितलं. मी त्यांना शरद पवारांना सांगा असं सांगितलं मात्र त्यांनी पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली होती, असी आठवण तटकरे यांनी सांगितली. त्यानंतर माझ्यावर श्वेत पत्रिका काढण्याची वेळ आली. मी लोकसभा निवडणूक हरलो त्यावेळी अजित पवारांचा फोन आल्याचे तटकरे म्हणाले.
2014 साली निकाला लागल त्यावेळी मला शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला लावला, 2019, 2022 साली काय झालं आपण पाहिलं. 2023 मध्ये अजित पवारांनी एकट वाटत असल्याचं सांगितलं. त्यावेळी मी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आम्ही अजित पवारांना पाठिंबा दिला आणि 3 जुलै 2023 ला आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी एमइटी मधे भाषण केलं दिड तास ते बोलत होते. त्यांनी सर्व खदखद त्यावेळी सांगितली. काय पद्धतीने निर्णय घ्यावा लागला त्यावेळी सांगितल्याचे तटकरे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.