‘…पण कॉलही उचलला गेला नाही, नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही’, अजितदादांना जाऊन एक महिन
अजित पवार यांच्या निधनावर रोहित पवार आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला (Ajit Pawar Death) एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी 2026 हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात (Baramati Plane Crash) अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीजवळ विमान लँडिंगच्या तयारीत असताना विमान कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. आज रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी त्यांना कॉल केल्याची व्हाट्सअॅप चॅट शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे.
Rohit Pawar on Ajit Pawar Death: नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही. खूप वेदनादायी! अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही..😭
खूप वेदनादायी..!#अजितदादापवार #justice_for_AJIT_DADA pic.twitter.com/mXpbu89T9K
– रोहित पवार (@RRPSpeaks) 28 फेब्रुवारी 2026
Rohit Pawar on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांची आक्रमक भूमिका
दरम्यान, Rohit Pawar यांनी १० आणि १९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. हा अपघात घातपात असू शकतो का, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. तसेच नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) आणि VSR कंपनीच्या कथित निष्काळजीपणावरही त्यांनी बोट ठेवले. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. रोहित पवार यांना या भूमिकेत अमोल मिटकरी यांचीही साथ लाभली आहे. दोन्ही नेत्यांनी या दुर्घटनेतील संभाव्य निष्काळजीपणाबाबत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.