दादांना जाऊन एक महिना झाला; अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले तिथं जाऊन सर्वांनी घेतलं दर्शन, तटक
Ajit Pawar Death : आज २८ फेब्रुवारी २०२६ आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी २०२६ हा दिवस काळ बनून आला. अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने बारामतीला चालले होते. बारामतीजवळ विमान लँड करताना तांत्रिक बिघाड झाला आणि अजित पवारांचं (Ajit Pawar) विमान कोसळलं भीषण स्फोट झाला या अपघात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारीला म्हणजेच या घटनेच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आज या घटनेला महिना उलटल्यानंतर जय पवार(Jay Pawar), पार्थ पवार (Parth Pawar), सुनील तटकरे हे सर्वजण विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते.
वाहिनींना जबाबदारी द्यावी अशी भूमिका आम्ही घेतली
यावेळी दर्शन घेतल्यानंतर सुनील तटकरेंनी म्हटलं की, दादांना जाऊन एक महिना झाला. आज त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. आमची सुरुवातपासून मागणी आहे. सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री यांना भेटलो त्यांना निवेदन दिले. त्यांनी अमित शाह यांच्याकडे पत्रव्यवहार केला. काही प्रश्न निर्माण केलेत. आमची भूमिका ही आहे की, व्यवस्थित तपास व्हावा. दादांच्या निधनाने दुःख झालं आहे. तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा. सगळ्या बाजूने तपास करावा. दादांचे निधन झालं त्यावेळी वाहिनींना जबाबदारी द्यावी अशी भूमिका आम्ही घेतली. दादांनंतर वहिनींनी जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली. त्यांनी जबाबदारी स्वीकारली, त्याचे ऋण आम्ही व्यक्त करतोय. ज्यांना कोणाला बोलायचं आहे. कोण प्रखर टीका करत होते, दादा काय म्हणाले त्यांचे भाषणं आहेत. कोण 2019 ला भाजपला तिकिट मागण्यांसाठी गेले होते, मला आणि दादांना माहीती आहे. 2023 पासून आतापर्यंत काय टीका करत होते, मला माहित आहे, त्यावर मी आता बोलणार नाही, पण ज्यावेळी बोलायचं यावेळी बोलेल दादांचे शव इथे असताना विलीनीकरणाची भाषा करीत होते. त्यांनी काय बाईट दिले ते बघा, दोन दिवसात काय बोलले ते पाहावं, असं म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
कोण 2019 ला तिकीट मागायला भाजपकडे गेले होते…
ज्यांनी आरोप केलेत त्याचा तपास व्हावा. रोहित पवारांना काय वाटत त्यावर काय बोलू. त्यांची मते काय होती ती मला माहित आहेत. 2019 सालचा उल्लेख तटकरेंनी यावेळी केलेला आहे. ते रोहित पवारांच्या संदर्भात आहे. रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना इशारा दिला होता. त्यासंदर्भात सुनील तटकरे यांना विचारला असता सुनील तटकरेंनी रोहित पवारांवरती निशाणा साधला आहे. कुणी दादांवर प्रखर जहरी टीका केली हे लोकांनी अनुभवले आहे. बारामतीत दादांनी सांगितलं होतं की, मी एकटा आहे. कोण 2019 ला तिकीट मागायला भाजपकडे गेले होते, याची दादांकडे माहिती होती, माझ्याकडे माहिती आहे, असं म्हणत रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.