Please…एकदा, दोन सेकंद नाही लागणार..; मुंबईत दोन तरुणांकडून पोर्तुगीज कंटेट क्रिएटरची छेड
मुंबई क्राईम न्यूज: मुंबईत आलेल्या पोर्तुगीज कंटेट क्रिएटर महिलेला दोन तरुणांनी छेडल्याची घटना समोर (Mumbai Crime News) आली आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाची स्वत: दखल घेत गुन्हा दाखल केला. तसेच पोर्तुगीज महिलेला सेल्फीसाठी छेडणाऱ्या दोन तरुणांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आयनस फारिया नावाची पोर्तुगीज कंटेट क्रिएटर भारत भ्रमंतीवर आली होती. मुंबईतील धोबीघाट परिसरात फिरत असताना आयनस फारियाकडे दोन तरुण वारंवार सेल्फीसाठी हट्ट करत होते. Please, एकदा, एक सेल्फी…दोन सेकंद नाही लागणार…असं सदर तरुण आयनस फारिया बोलताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. आयनस फारियाने अनेकवेळा नकार दिल्यानंतरही सदर दोन तरुण तिचा पाठलाग करत होते. 22 फेब्रुवारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पोर्तुगीज महिलेसोबत संपर्क साधून दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांकडून कारवाई- (foreign tourist woman harassed in mumbai)
फारियाच्या व्हायरल व्हिडीओनंतर मुंबई पोलिसांनी तिच्याशी मेसेजद्वारे संपर्क साधला. या प्रकरणात मदत करण्यासाठी पोलिसांनी तिचा पत्ता आणि संपर्क तपशील मागितले. फारियाने पोलिसांना सहकार्य केले, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी माहिती गोळा केली आणि दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. परदेशी महिलेच्या कथित छळप्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम 78(1) 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
काय म्हणाली ऐनस फारिया? (मुंबई क्राईम न्यूज)
दोन महिन्यांपासून मी भारतात आहे. पण माझ्यासोबत पहिल्यांदा असा प्रकार घडला. भारतातील माझा अनुभव सुंदर आहे. मात्र घडलेल्या प्रकारावर आयनस फारियाने नाराजी व्यक्त केली. फारियाने पुढे सांगितले की, मी नकार दिल्यानंतरही, दोन तरुण फोटो काढण्यासाठी माझा पाठलाग करत राहिले. यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले. ते खूप जबरदस्ती करत होते.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.