4 संघ, 3 सामने, 3 मैदान…; सेमीफायनलमध्ये कोण कोणाविरुद्ध आणि कुठे भिडणार?, A टू Z माहिती
T20 विश्वचषक 2026 उपांत्य फेरीचे वेळापत्रक मराठी बातम्या : टी-20 विश्वचषक 2026 आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 5 विकेट्सनी दमदार विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. त्यासोबतच स्पर्धेतील चारही उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले असून, आता सर्वांच्या नजरा भारताच्या पुढील सामन्याकडे लागल्या आहेत.
𝐀𝐧𝐝 𝐭𝐡𝐞𝐧 𝐭𝐡𝐞𝐫𝐞 𝐰𝐞𝐫𝐞 𝐟𝐨𝐮𝐫 🤩
द #T20WorldCup 2026 उपांत्य फेरी बंद आहेत 🔒
अधिक तपशील➡️ https://t.co/0UKXfuke7c pic.twitter.com/IxJeZvr5M3
— ICC (@ICC) 1 मार्च 2026
उपांत्य फेरी-2 : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England Semi-Final-2)
भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. विजयी संघाला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळणार असल्याने हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो किंवा मरो’चा ठरणार आहे.
ग्रुप स्टेजमध्ये भारताने प्रभावी कामगिरी केली. अमेरिकेविरुद्ध विजयाने मोहिमेची सुरुवात करत नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांना पराभूत करून सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवला. सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला, मात्र त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध विजय आणि वेस्ट इंडिजवर मात करत भारताने दमदार पुनरागमन केले.
इंग्लंडचाही प्रवास प्रभावी राहिला आहे. सुपर-8 टप्प्यात त्यांनी श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांवर मात केली आहे. त्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील ही लढत अत्यंत चुरशीची आणि थरारक होण्याची चिन्हे आहेत.
पहिला उपांत्य सामना : दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (South VS New Zealand Semi-Final-1)
स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिका हा आतापर्यंत अपराजित राहिलेला एकमेव संघ आहे. त्यांनीच सुपर-8 मध्ये भारताचा विजयी रथ 76 धावांनी रोखला होता. न्यूझीलंडची संघरचना संतुलित असून, ते मोठ्या सामन्यांमध्ये नेहमीच धोकादायक ठरतात.
टी-20 विश्वचषक 2026 संपूर्ण वेळापत्रक (T20 World Cup 2026 Semi Final Schedule)
| चेहरा | संघ | दिनांक आणि वेळ | ठिकाण |
| पहिला सेमीफायनल | दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड | 4 मार्च 2026 (बुधवार), संध्याकाळी 7:00 वा. | कोलकाता |
| दुसरा सेमीफायनल | इंग्लंड विरुद्ध भारत | 5 मार्च 2026 (गुरुवार), संध्याकाळी 7:00 वा. | मुंबई |
| अंतिम सामना | विजेता SF1 वि विजेता SF2 | 8 मार्च 2026 (रविवार) | अहमदाबाद |
अंतिम सामना कुठे आणि कधी?
दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. आता सर्व क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत इंग्लंडवर मात करून अंतिम फेरीत पोहोचणार का? की इंग्लंड भारताचा मार्ग रोखणार? येणारे काही दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने थरार आणि उत्कंठेने भरलेले असणार आहेत!
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.