वेस्ट इंडिज हरवणार, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणारच नाही बोलणारा मोहम्मद आमिर आता म्हणातो…
मोहम्मद अमीर इंड विरुद्ध WI T20 WC 2026: भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) पाच विकेट्सने पराभव केला. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ ठरला. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने सर्वाधिक यशस्वी टी-20 धावांचा पाठलाग करण्याचा विश्वविक्रमही केला.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 195 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य चार चेंडू शिल्लक असताना गाठले. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही सहावी वेळ आहे. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि इशान किशन अपयशी ठरले तेव्हा संजू सॅमसनने जबाबदारी स्वीकारली आणि 97 धावांची ऐतिहासिक खेळी केली. सॅमसनने या ऐतिहासिक खेळीत 12 चौकार आणि चार षटकार मारले. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) मोठा दावा केला होता.
मोहम्मद आमिर काय म्हणाला होता? (Mohammad Amir Ind vs WI T20 WC 2026)
वेस्ट इंडिजचा संघ भारताचा पराभव करेल. भारत सेमीफायनलमध्ये जाणार नाही, हे मी ठामपणे सांगतो, असं मोहम्मद आमिर एका यूट्युब चॅनलशी बोलताना म्हणाला होता. त्यानंतर काल भारताने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव केला. यावर विचारले असता संजू सॅमसनने क्रिकेट कारकीर्दमधील सर्वोत्तम खेळी केली. तसेच मी आताही सांगतो, टीम इंडिया चांगलं क्रिकेट खेळत नाहीय, असंही मोहम्मद आमिर म्हणाला.
टीम इंडियाचे खराब क्षेत्ररक्षण- (Team India T20 World Cup 2026)
वेस्ट इंडिजविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाचे क्षेत्ररक्षणही या सामन्यात खराब होते. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी सोपे झेल सोडले, ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. अभिषेकने रोस्टन चेसचा झेल सोडला, तर तिलक वर्मा यांनी रदरफोर्डचा सीमारेषेवर झेल सोडला. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 13 झेल सोडले आहेत, जे उपांत्य फेरीपूर्वी चिंतेचा विषय आहे.
सेमीफायनमध्ये कोण कोणाविरुद्ध भिडणार? (T20 World Cup Semi Final 2026)
2026 च्या टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.