5 सामन्यात फ्लॉप, न्यूझीलंड मालिकेतून बाहेर….; गौतम गंभीरला संजू सॅमसनचे दुःख समजले, ठरला वर्
संजू सॅमसनवर गौतम गंभीर: भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) पाच विकेट्सने पराभव केला. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ ठरला. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने सर्वाधिक यशस्वी टी-20 धावांचा पाठलाग करण्याचा विश्वविक्रमही केला.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 195 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य चार चेंडू शिल्लक असताना गाठले. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही सहावी वेळ आहे. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि इशान किशन अपयशी ठरले तेव्हा संजू सॅमसनने जबाबदारी स्वीकारली आणि 97 धावांची ऐतिहासिक खेळी केली. सॅमसनने या ऐतिहासिक खेळीत 12 चौकार आणि चार षटकार मारले. सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संजू सॅमसनचे कौतुक केले. (Gautam Gambhir On Sanju Samson)
गौतम गंभीर काय म्हणाला? (Gautam Gambhir On Sanju Samson)
भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गौतम गंभीरने संजू सॅमसनचे तोंडभरुन कौतुक केले. संजू सॅमसन हा एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. संजू सॅमसनने टी-20 क्रिकेटमध्ये 3 शतके झळकावली आहेत. आम्हाला त्याची प्रतिभा नेहमीच माहिती होती. न्यूझीलंडविरुद्धची मालिका कठीण होती, कधीकधी त्याला विश्रांती देणे महत्त्वाचे असते. पण आम्हाला नेहमीच माहिती होते की, जेव्हा जेव्हा आम्हाला विश्वचषक सामन्यात संजू सॅमसनची गरज असेल तेव्हा तो येईल आणि कामगिरी करेल, असं गौतम गंभीर म्हणाला.
गंभीर म्हणाला, “संजू सॅमसनकडे 3 T20I शतके आहेत, आम्हाला नेहमीच त्याची प्रतिभा माहित होती, न्यूझीलंड विरुद्ध त्याच्याकडे कठीण मालिका होती, कधीकधी ब्रेक देणे महत्वाचे असते परंतु आम्हाला नेहमी माहित होते की, जेव्हाही आम्हाला विश्वचषक सामन्यात त्याची आवश्यकता असेल तेव्हा तो येईल आणि देईल”. pic.twitter.com/5wzgr0Z1pw
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 1 मार्च 2026
भारतापूर्वी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडने आधीच सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. सुपर 8 च्या पहिल्या गटातून भारत आणि दक्षिण आफ्रिका, तर दुसऱ्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवत सेमीफायनलमध्ये पोहोचले. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव केला. सुपर 8 सामन्यात पाकिस्तान श्रीलंकेला 65 किंवा त्याहून अधिक धावांनी हरवू शकला नाही, त्यामुळे न्यूझीलंडने अंतिम चारमध्ये प्रवेश केला.
सेमीफायनमध्ये कोण कोणाविरुद्ध भिडणार? (T20 World Cup Semi Final 2026)
2026 च्या टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.