आखाती देशात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांकडे सोपवल

इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष: गेल्या चार दिवसांपासून अमेरिका–इस्रायल आणि इराण (US Israel vs Iran War) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता इतर देशांवर उमटू लागले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तर महाराष्ट्रातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्री काही प्रवासी सुरक्षितपणे भारतात परतले आहेत. मात्र, अजून देखील अनेक प्रवासी दुबईसह आखाती देशात अडकलेले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून अडकलेल्या नागरिकांना परत भारत आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी नियमित संवाद साधत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले आहे.

Israel vs Iran Conflict: मुख्यमंत्री स्वतः विविध यंत्रणांशी संपर्कात

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत.

Israel vs Iran Conflict: व्हॉटसॲप क्रमांक जारी

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357

आणखी वाचा

Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.