राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नव
महाराष्ट्र शासनाची पशुवैद्यकीय आरोग्य यंत्रणा: राज्यातील सुमारे अडीच हजार शासकीय पशुवैद्यक (पशुधनावर उपचार करणारे शासकीय डॉक्टर ) आणि 4 हजार पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शासकीय पशु रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडून शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभा राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Government Veterinary Health System)
महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या अमानवीय आणि तुघलकी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अत्यल्प मनुष्यबळ असताना एक एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवण्यात आलं असून आधीच कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या पशुवैद्यकांना रात्री उशिरा ही तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा पशुसंवर्धन विभाग ठेवत असल्याचा आरोप राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने केला आहे. 2500 शासकीय पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन आणि त्यानंतर सामूहिक राजीनामे देणार असल्यामुळे राज्यातील शासकीय पशु वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे. (Maharashtra Government Veterinary Health System)
महाराष्ट्र राज्यातील पशुवैद्यक संघटनेचे पशुसंवर्धन विभागावर केलेले आरोप- (महाराष्ट्र शासकीय पशुवैद्यकीय आरोग्य यंत्रणा)
- अत्यल्प मनुष्यबळावर एक एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवला…
- शासकीय पशु दवाखान्यांच्या वेळा कारण नसताना बदलण्यात आल्या..
- फिल्डचे काम डोक्यावर टाकले असताना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक केली…
- सतत ऑनलाईन अहवाल आणि ॲपवर अपडेट साठी दबाव टाकले जाते…
- रात्री उशिरा तात्काळ सेवा देण्याची अवाजवी अपेक्षा ठेवली जाते…
- तांत्रिक अधिकाऱ्यांवर अतांत्रिक कामे सोपवण्यात आली..
राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने आंदोलन सुरू केले असून ते टप्प्याटप्प्याने वाढवले जाणार- (Maharashtra Government Veterinary Health System)
- 2 मार्च रोजी सुमारे अडीच हजार पशुवैद्यकांनी शासनाच्या व्हाट्सअप ग्रुप बहिष्कार घालत सोडले आहे.
- 4 मार्च रोजी सर्व पशुवैद्यक काळ्याफिती लावून काम करणार…
- 5 मार्च रोजी सामूहिक रजा घेतली जाणार…
- 6 मार्च रोजी सर्व शासकीय अहवाल देणे बंद केले जाईल…
- 9 मार्च रोजी राज्यभर उपोषण केले जाईल…
- 0 मार्च रोजी 2500 पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामे देतील…
शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची चिन्ह- (Maharashtra Government Veterinary Health System)
टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणाऱ्या या आंदोलनाकडे सरकारने वेळीच लक्ष घातले नाही, तर 10 मार्च रोजी राज्यभरातील 2500 पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामे देतील आणि त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधनांवर उपचार करणारी शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची चिन्ह आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.