अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राज

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar)  हे हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी २६ जानेवारीला पुण्यात आपला राजीनामा हा अजित पवार यांच्याकडे सोपवला होता, अशी माहिती समोर आली आहे. तर ते राजीनामे अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंजूर केले नव्हते अशीही माहिती आहे. पण अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षाकडून या सर्व सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे कारणे न विचारताच मंजूर करण्यात आले आहेत.

कोणत्या नेत्यांनी दिलेले राजीनामे?

मनोज व्यवहारे – असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष
सुभाष मालपाणी- उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष
सचिन जाधव – मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष

२६ जानेवारी रोजी अजित पवारांकडे दिलेले राजीनामे

राजीनामे दिलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संदर्भात नाराजी आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. २६ जानेवारी रोजी अजित पवार पालकमंत्री असल्यामुळं पक्ष कार्यालयात गेले होते, त्यानंतर झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला देखील ते जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले होते. त्यानंतर अजित पवारांकडे काही पत्र पक्षकार्यालयात गेल्यावर देण्यात आले होते. यामध्ये असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी आणि मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव होते. या तिघांनी आपल्याला वरिष्ठांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची आणि योग्य सहकार्य मिळत नसल्याची भावना आणि नाराजीमुळे आपण राजीनामा देत असल्याचं पत्रात म्हटलं होतं. या तिन्ही नेत्यांचा रोख हा थेट सुनील तटकरे यांच्याकडे होता.

तिघांनी थेट राजीनामे दिले होते, त्यावेळी अजित पवारांनी ते राजीनामे स्वीकार केलेले नव्हते, त्यानंतर आता अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर हे राजीनामे प्रदेश कार्यालयाकडे पोहोचले होते, हे तिनही राजीनामे आता स्वीकार करण्यात आले आहेत. या विभागावर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे कोणाची निवड करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, या नेत्यांनी दिलेले राजीनामे सध्या चर्चेत आले आहेत.

पत्रात नेमकं काय म्हटलेलं?

लोकशाहीवादी पक्षात संघटनात्मक पातळीवर असमानता तथा न्यायीक तत्वांचा अभाव व वरिष्ठ पातळीवरुन असहकार्याचा भूमिकेमुळे यापुढील काळात संघटनावाढी सहकार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा टोकाच्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये जबाबदार पदावर कार्य करणे असहय झाल्यामुळे भविष्यातील हानी टाळणे कामी येथे थांबणे क्रमप्राप्त झाल्यामुळे, आज भारतीय प्रजासत्ताक दिनी पक्षातील जबाबदारीला पूर्णविराम म्हणून असंघटित कामगार विभाग, प्रदेश अध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक. सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे त्याचा स्विकार करुन मला जबाबदारीतून मुक्त करावे ही विनंती. आदरणीय दादा, आजपावेतो आपण सामाजिक कार्य करण्याकरिता आपल्या प्रगल्भ नेतृत्वामध्ये वेळोवेळी दिलेल्या राजकीय पदाची संधी तथा मार्गदर्शनाबद्दल आपला ऋणी आहे.

आणखी वाचा

Comments are closed.