कुंबळे, पुजारा, पठाण, कैफ, रैनासह 8 जणांची सेमीफायनसाठी 4 संघ निवडलेले; फक्त 2 दिग्गजांची भविष्
T20 विश्वचषक 2026 उपांत्य फेरी: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2026) उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि भारत हे चार संघ पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला कोलकाता येथे उपांत्य फेरीची लढत होणार आहे. तर, 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होईल.
टी-20 विश्वचषकाआधी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी सेमीफायनलसाठी पोहोचणाऱ्या 4 संघांची नावं जाहीर केली होती. अनिल कुंबळे, चेतेश्वर पुजारा, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, आकाश चोप्रा, संजय बांगर, रॉबीन उथप्पा यांनी टी-20 विश्वचषक 2026 मधील सेमीफायनमध्ये पोहोचणाऱ्या 4 संघांची नावे सांगितली होती. मात्र यामधून रॉबीन उथप्पा आणि मोहम्मद कैफ यांचीच भविष्यवाणी खरी ठरली. (T20 World Cup 2026 Semifinal)
सेमीफायनलसाठी कोणी कोणते संघ निवडलेले?
- अनिल कुंबळे- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड.
- चेतेश्वर पुजारा- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड.
- इरफान पठाण- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड.
- मोहम्मद कैफ- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
- सुरेश रैना- भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका.
- आकाश चोप्रा- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
- संजय बांगर- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
- रॉबीन उथप्पा- भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला उपांत्य फेरीचा सामना- (NZ vs SA Semifinal T20 WC 2026)
टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (South Africa vs New Zealand) यांच्यात होणार आहे. हा ऐतिहासिक सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. एकीकडे, दक्षिण आफ्रिका स्पर्धेत अपराजित आहे आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येते. दुसरीकडे, न्यूझीलंड त्यांच्या पहिल्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यासाठी मैदानात उतरेल.
टी-20 विश्वचषक 2026 संपूर्ण वेळापत्रक (T20 World Cup 2026 Semi Final Schedule)
| चेहरा | संघ | दिनांक आणि वेळ | ठिकाण |
| पहिला सेमीफायनल | दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड | 4 मार्च 2026 (बुधवार), संध्याकाळी 7:00 वा. | कोलकाता |
| दुसरा सेमीफायनल | इंग्लंड विरुद्ध भारत | 5 मार्च 2026 (गुरुवार), संध्याकाळी 7:00 वा. | मुंबई |
| अंतिम सामना | विजेता SF1 वि विजेता SF2 | 8 मार्च 2026 (रविवार) | अहमदाबाद |
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.