मोठी बातमी: भाजपच्या अदृश्य मदतीवर शरद पवार राज्यसभेवर जाणार?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
राज्यसभा निवडणूक 2026: निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2026) तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. (Rajya Sabha Election 2026) राज्यसभेसाठी उद्या म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्याआधी महाराष्ट्रातून एक महत्वाची राजकीय माहिती समोर आली आहे. (Mahavikas Aghadi vs Mahayuti)
शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर भाजप पाचवा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी आहे. तरी महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली नाही. मविआची आज बैठक आहे. शरद पवारांना उमेदवारी देण्यावरून मविआत एकमत होत नसल्याने अजूनही घोषणा झालेली नाही. राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. मात्र मविआच्या भूमिकेवर भाजप नवा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. शरद पवार मविआचे उमेदवार नसतील तर भाजपचे पाच आणि शिवसेना,राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेच्या रिंगणात असेल अशी सूत्रांची माहिती आहे. (Sharad Pawar Rajya Sabha Election 2026)
भाजप शरद पवारांच्या उमेदवारीसाठी पडद्यामागून आग्रही? (BJP insists on Sharad Pawar getting nomination for Rajya Sabha )
- शरद पवारांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीमध्ये पक्षांच्या काही नेत्यांमध्ये नाराजी उफाळू शकते आणि आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते.
- शरद पवारांना उमेदवारी दिल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचे महाविकास आघाडी मध्ये संख्याबळ जास्त असताना सुद्धा उमेदवारी पासून दूर ठेवण्यास भाजपला यश मिळेल.
- काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी राज्यसभेची उमेदवारी आवश्यक असताना शरद पवारांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसला यामुळे फटका बसू शकतो, हे भाजपला राज्यसभेसाठी महत्त्वाचा असेल.
- विलीनीकरणाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांची सुरू असताना शरद पवारांना उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा संभ्रम कायम राहू शकतो आणि हे महायुतीसाठी फायद्याचा ठरू शकतो.
- महाविकास आघाडी कडून शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास महायुतीकडून सुद्धा सातवा उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यामुळे उमेदवारी महायुतीने सुद्धा जाहीर करण्यासंदर्भात वेट अँड वॉच ची भूमिका ठेवली आहे.
महाराष्ट्रमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य)
- शरद पवार (श.प. गट)
- रामदास आठवले (रिपाई)
- फौजिया खान (श.प. गट)
- रजनी पाटील (काँग्रेस)
- प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
- धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
- भागवत कराड (भाजप)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)
- 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
- 6 मार्च – अर्जांची छाननी
- 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
- 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.