मोठी बातमी: ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला, काय घडलं
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Raj Thackeray Meet मराठी) यांची ठाण्यात जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरुन राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी अबोला धरल्याचं बोललं जात आहे. (Uddhav Thackeray And Raj Thackeray Alliance BMC)
स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समिती निवडणुकीवबाबत शिवतीर्थावरून एक पाऊल पुढे टाकत मातोश्रीवर विचारणा झाली. मात्र मातोश्रीवरून कोणतेचम उत्तर आले नाही, उलट स्वीकृत नगरसेवक परस्पर जाहीर करण्यात आले. यात मनसेला विश्वासात घेण्यात आले नाही. मात्र प्रभाग समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना विचारणा करण्यात आली. त्यामुळे मनसेत नाराजी असल्याची चर्चा आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी प्रभाग समिती निवडणुकी तठस्थ भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांना प्रभाग समिती निवडणुकीत फटका बसणार आहे. (MNS Raj Thackeray-Shivsena UBT Uddhav Thackeray)
राज ठाकरेंच्या तटस्थतेमुळे उद्धव ठाकरेंना कसा फटका बसणार- (Raj Thackeray And Uddhav Thackeray)
प्रभाग समिती एस आणि टी-
- उबाठा- 8 नगरसेवक
- मनसे- 1 नगरसेवक- तटस्थ
- काँग्रेस- 1
- एकूण मविआ संख्याबळ – 9
प्रभाग समिती एस आणि टी-
- भाजप- 9
- शिवसेना शिंदे- 1
- एकूण महायुती संख्याबळ- 10
(इथली प्रभाग समिती मनसेच्या तटस्थतेमुळे महायुतीकडे जाणार, मनसे मविआसोबत असती तर संख्याबळ बरोबरीत जाऊन ईश्वरचिठ्ठी निघाली असती)
विभाग समिती-F दक्षिण, F उत्तर
- उबाठा- 6 नगरसेवक
- मनसे- 1 नगरसेवक- तटस्थ
- काँग्रेस-1 नगरसेवक
- मविआ- सपासोबत असल्यास- 8
- भाजप- 5 नगरसेवक
- शिवसेना- 3 नगरसेवक
महायुती- 8
- सपा-1 – सपा कुणासोबत जाणार हे अधिकृतरित्या जाहीर नाही.
(सपा मविआसोबत राहीली तरी बरोबरीत सामना होऊन ईश्वर चिठ्ठी निघेल आणि महायुतीसोबत गेली तर प्रभाग समिती महायुतीच्या पारड्यात जाईल.)
नेमकं काय घडलं? (MNS-Shivsena UBT)
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगर पालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक झाले या पैकी एक नगरसेवक मनसेचा व्हावा, अशी मनसेची अपेक्षा होती. स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्ष पद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होते, अशी चर्चा दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये झाली. मात्र आता प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहण्याची भूमिका मनसे घेत असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडेल. पुढील तीन दिवसांत या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. महापौर-उपमहापौर निवडीनंतर ही पहिली मोठी राजकीय चाचणी मानली जात असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरे काय म्हणाले होते? (Raj Thackeray On मराठी Meet)
एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. आपल्याकडे आता पूर्वीसारखं राजकारण राहिलेलं नाहीय. आता काही नाहीय. निवडणुका संपल्या आहेत. आम्हाला जर काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करुन घ्यायच्या असतील, तर भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायची गरज नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. मी त्याचदिवशी बोलणार होतो. आपल्याकडे चांगले रस्ते, फ्लायओव्हर्स व्हावेत चांगली गोष्ट आहे. मात्र आपण मूळ गोष्टाली हात घालत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे त्याचा लोकांना किती त्रास होतोय, मलाही होतोय. लोकांकडे एकापेक्षा जास्त कार असतात. अनेक इमारतींमध्ये पार्किंगचा मोठा मुद्दा आहे. मागे हीच गोष्ट मी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती. त्यांनी लगेच भूषण गगराणींना फोनकरून सांगितले होते, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भेटेन, असंही राज ठाकरे म्हणाले.
मुंबईमहापालिका फायनल निकाल- (BMC Election Result 2026)
भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
राष्ट्रवादी-3
एसपी-2
राष्ट्रवादी शप – १
————
227/227
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.