निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारां

जामखेड : शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञातांनी गोळीबार केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा हल्ला (Crime News) झाला. मोहळकर याच्यावर पाच ते सहा राऊंड फायर (Crime News) करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम जामखेडमधील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. आज (गुरूवारी, ता ५) मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या जामखेड येथील गोळीबारात जखमी झालेल्या सागर मोहळकरला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. (Crime News)

गोळ्या लागल्यानंतर मोहळकर रस्त्यावर कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, मोहळकर नुरानी कॉलनी परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर अचानक गोळीबार सुरू केला. हल्ला इतका अचानक झाला की परिसरात एकच गोंधळ उडाला. सलग झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांनी भीतीपोटी आसरा घेतला. गोळ्या लागल्यानंतर मोहळकर रस्त्यावर (Crime News)कोसळला. हल्लेखोरांनी घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली. जखमी मोहळकर याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असल्याचे स्पष्ट झाले. एकूण पाच ते सहा गोळ्या झाडण्यात (Crime News) आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याची प्रकृती (Crime News) चिंताजनक असल्याचे समजते.(Crime News)

महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटला होता

दरम्यान, मोहळकर याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण (Crime News) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि महिनाभरापूर्वीच (Crime News) जामिनावर सुटला होता. त्याच्या सुटकेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील वाद पुन्हा चिघळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर नुरानी कॉलनी व परिसरात काही काळ भीतीचे (Crime News) वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.