भारत की इंग्लंड, फायनलमध्ये कोणता संघ हवा?; सेमीफायनलमध्ये 33 चेंडूत शतक ठोकणार अ‍ॅलन म्हणाला..

भारत विरुद्ध इंग्लीश T20 विश्वचषक 2026: कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs New Zealand) यांच्यात खेळवण्यात आला.  या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (NZ vs SA)

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 169 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे लक्ष्य अवघ्या 12.5 षटकांत पूर्ण केलं. न्यूझीलंडकडून फिन अ‍ॅलनने (Finn Allen) विश्वचषकात वेगवान शतक झळकावताना 33 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी केली. तर टीम सेफर्टने 33 चेंडूत 58 धावा केल्या. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर फिन अ‍ॅलनला भारत की इंग्लंड…फायनलमध्ये कोणता संघ हवा?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर हा अंतिम सामना असेल, त्यामुळे कोण पोहोचेल हे महत्त्वाचे नाही. आम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल, असं फिन अ‍ॅलनने स्पष्ट केले.

आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल- (Ind vs Eng 2nd Semifinal T20 World Cup 2026)

टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात (Ind vs Eng 2nd Semifinal T20 World Cup 2026) येणार आहे. भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात दुसऱ्या सेमीफायनलचा सामना रंगेल. आज जो संघ विजयी होईल, तो न्यूझीलंडविरुद्ध 8 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळेल.

सूर्यकुमार यादवही एका मॅच विनिंग इनिंगच्या प्रतीक्षेत- (Ind vs Eng T20 World Cup 2026)

भारताची टीम लयीत आली असली तरी सांघिक पातळीवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने आता खेळाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. दमदार सलामी, भक्कम मधली फळी आणि हाणामारीच्या षटकात जोरदार आक्रमण या त्रिसूत्रीवर आपला खेळ आता व्हायला हवा. अविस्मरणीय खेळीतून बाहेर येत संजू सॅमसन आणखी एक मोठी इनिंग करण्यास उत्सुक असेल. त्याच वेळी अभिषेक, ईशान आणि कंपनी फटक्यांची आतषबाजी करायला उत्सुक असेल. होळी नुकतीच झालीय. पण, या फलंदाजांना त्यांच्या क्षमतेला साजेशी फटक्यांची मनमुराद उधळण करता आली नाहीये. सेमी फायनलमध्ये हे उट्टं फेडण्यासाठी ही जोडगोळी उत्सुक असेल. तसंच सूर्यकुमार यादवही एका मॅच विनिंग इनिंगच्या प्रतीक्षेत आहे.

संबंधित बातमी:

Ind vs Eng 2nd Semifinal T20 World Cup 2026: संजू सॅमसनवर बंदी?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढणार, सोशल मीडियावर नेमकी चर्चा काय?

आणखी वाचा

Comments are closed.