बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्ही
बदलापूर गर्भाशयाची अंडी विक्रीचे रॅकेट बदलापूर येथील स्त्री बीज अवैध विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य सरकार (Maharashtra Government) अलर्ट मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वच आयव्हीएफ (IVF) सेंटरच्या कारभाराची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शहरातील IVF केंद्रांची तपासणी केली जाणार असून अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर प्रकरणात नाशिक कनेक्शन उघड
बदलापूर प्रकरणाचा तपास सुरू असताना नाशिक कनेक्शन समोर आले. त्यानंतर नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरवर कारवाई करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द केली. संबंधित केंद्र सील करण्यात आले आहे. तर महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी मालती आयव्हीएफ सेंटरचा संचालक डॉ. अमोल पाटील याला बदलापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डॉ. पाटीलवर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे. त्याच्या पोलीस कोठडीतून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Badlapur Uterine Eggs Selling Racket: आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय
पोलिस तपासात हे रॅकेट केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्त्री बीज तस्करीशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदलापूरमध्ये एका घरातून अवैधरीत्या स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स साठवून गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवले जात होते. त्यानंतर त्यांना IVF सेंटरमध्ये पाठवून ऑपरेशनद्वारे बीज काढून त्यांची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Badlapur Uterine Eggs Selling Racket: राज्यभरात चौकशीचे आदेश
प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता राज्य सरकारने सर्व IVF केंद्रांची संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या पथकांकडून कागदपत्रे, परवाने, वैद्यकीय प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.