Iran Israel US war – इराणने 24 तासात घेतला बदला; पर्शियन आखातात अमेरिकन टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंद महासागरातून परतणाऱ्या इराणच्या ‘आयरिस देना’ या युद्धनौकेवर अमेरिकन पाणबुडीतून पाणतीर डागले आणि या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली. यामुळे तआखातात युद्धाचा भडका उडाला आहे. या हल्ल्याचा इराणने अवघ्या 24 तासांमध्ये बदला घेतला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) पर्शियन आखातात अमेरिकन टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकन टँकरला भीषण आग लागली आहे.

इराणची ‘आयरिस देना’ ही युद्धनौका विशाखापट्टणम येथे नौदल सरावात सहभागी होऊन परतत असताना अमेरिकेने तिच्यावर हल्ला चढवला. पाणबुडीतून ‘मार्क-48’ हा पाणतीर डागून हा हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात 87 जणांचा बुडून मृत्यू झाला. श्रीलंकेच्या नौदलाने 32 जणांचे प्राण वाचवले असून सुमारे 67 जण बेपत्ता आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकन पाणबुडीने अशा प्रकारे शत्रूची नौका बुडवल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेला पश्चाताप होईल

दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. अमेरिकेला या कृत्याचा निश्चितच भीषण पश्चाताप होईल, असा इशारा त्यांनी दिला. या नंतर लागलीच इराणच्या नौदलाने अमेरिकेच्या टँकरवर निशाणा साधला.

आखातातील युद्ध हिंदुस्थानच्या दारात पोहोचले,हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडीतून हल्ला; 87 सैनिक ठार

दरम्यान, अमेरिकेने लक्ष्य केलेली ‘आयरिस देना’ ही युद्धनौका हिंदुस्थानने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती. फेब्रुवारी महिन्यात विशाखापट्टणम येथे झालेल्या या सरावात 72 देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला होता. सागरी मैत्रीचा संदेश देणारा हा सराव संपवून ही नौका परतत होती.

Comments are closed.