मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; भूपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठ

मुंबई : मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणीसंग्रहालयाला गेल्या चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा आहे. आशियाई सिंहाची जोडी मिळावी यासाठी आता महापौर रितू तावडे (Mumbai Mayor Ritu Tawde) यांनी पुढाकार घेतला असल्याचं दिसून येत आहे. यासाठी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Mumbai Mayor Ritu Tawdes letter to Gujarat Chief Minister) यांना पत्र पाठवले आहे. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी यासाठी महापौरांनी विनंती केली आहे.(Mumbai Mayor Ritu Tawdes letter to Gujarat Chief Minister)

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे पर्यटकांसाठी आकर्षण वाढवण्याच्या दृष्टीने आशियाई सिंह उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे (Mumbai Mayor Ritu Tawde) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

या पत्रात गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालय, जुनागढ येथून आशियाई सिंह मुंबईतील प्राणिसंग्रहालयासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय हे शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक आणि विद्यार्थी येथे भेट देतात.(Mumbai Mayor Ritu Tawdes letter to Gujarat Chief Minister)

त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील जैवविविधता वाढवण्यासाठी तसेच पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी आशियाई सिंह उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे महापौर रितू तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच गुजरात सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत. गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्याबदल्यात प्राणी किंवा पक्षी द्यावा लागणार आहे. पेग्विनसह काही पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(Mumbai Mayor Ritu Tawdes letter to Gujarat Chief Minister)

प्राणी संग्रहालयात आणखी कोणते प्राणी आहेत?

प्राणी संग्रहालयात सध्या शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी आहे, अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.