ज्येष्ठ नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, ज्योती वाघम

राज्यसभा निवडणूक 2026: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठीच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2026) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (मराठी) यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजीची लाट उसळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Rajya Sabha Election 2026: आनंदराव अडसूळ यांची उघड नाराजी

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. अडसूळ म्हणाले की, “मी चार टर्म खासदार राहिलो आहे. मला संसद रत्न पुरस्कारही मिळाला आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी माझं नाव विचारात घेतलं जावं, ही माझी इच्छा होती.” त्यांनी पुढे सांगितले की, “ज्योती वाघमारे यांचं नाव ऐनवेळी समोर आलं. हे नाव कसं पुढे आलं, याची मला माहिती नाही.” या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे मानले जात आहे.

Rajya Sabha Election 2026: राज्यपाल पदाच्या आश्वासनाचा उल्लेख

अडसूळ यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा करताना सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना राज्यपालपदाबाबत आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही ते आश्वासन पूर्ण झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या नाराजीला अधिक धार आल्याचे बोलले जात आहे.

Rajya Sabha Election 2026: शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आधीच आपले चार उमेदवार जाहीर केले होते. मात्र शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम होता. अखेर शिंदे गटाने नव्या चेहऱ्याला संधी देत ज्योती वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवला.

Rajya Sabha Election 2026: पक्षात अस्वस्थता वाढणार?

ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा शिंदे यांचा निर्णय ‘धक्कातंत्रा’चा भाग असल्याचे मानले जात आहे. मात्र अडसूळ यांच्या उघड नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणुकीआधीच शिंदे शिवसेनेत अंतर्गत राजकारण तापल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात ही नाराजी शांत होते की आणखी तीव्र होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य)

शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

आणखी वाचा

Rajya Sabha Election 2026: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठांना डावलत ‘या’ नवख्या चेहऱ्याला संधी, भल्याभल्यांचा अंदाज चुकला

आणखी वाचा

Comments are closed.